चाणक्यनीती

    10-Oct-2026
Total Views |
 
Chankya
त्यामुळे यमराजाप्रमाणेच क्राेधही ‘जीवघेणा’ आहे.
 
2. तृष्णा ः
तृष्णा ही न संपणारी आहे, अनंत आहे. ही जीवनातच नव्हे तर मृत्यूनंतरही पाठपुरावा करते. खरेतर खाऊन-पिऊन तृप्ती मिळायला हवी, म्हातारपणी इच्छा कमी व्हायला हव्यात; पण तसे हाेत नाही. ‘अगं गलितं, पलितं मुंडं, दशनविहीनं जातं तुंडं, वृद्धाे याति गृहित्वां दण्डं, न मुन्चति आशा पिण्डम्’ असे म्हटले जाते. ते खरेच आहे. वैतरणा नदीचे काेणतेही टाेक नाही; तिला अंत नाही; त्यात कितीही पाेहत राहिले तरी ती पार करता येत नाही.
तृष्णा अशीच आहे.