देवीच्या प्रसादाबाबत दक्षता घ्यावी

जिल्हाधिकाऱ्यांची अन्न, औषध प्रशासनास सूचना

    10-Oct-2026
Total Views |

Mahalaxmi 
काेल्हापूर, 9 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
काेल्हापुरातील नवरात्राेत्सवात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) देवीच्या प्रसादाबाबत दक्षता घ्यावी. महापालिकेने प्रदक्षिणा मार्ग सुसज्ज करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठाेड यांनी दिले.
 
शारदीय नवरात्राेत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयु्नत डाॅ. राजेंद्र भारूड, पाेलीस अधीक्षक निलाेत्पल, महापालिका उपायु्नत परिताेष कंकाळ, मंदिर समितीच्या सचिव वर्षा साळाेखे उपस्थित हाेत्या. नवरात्राेत्सवाच्या कालावधीत लाखाेंच्या संख्येने भाविक काेल्हापुरात येतात. या भाविकांची गैरसाेय हाेऊ नये याची दक्षता संबंधित विभागाने घेऊन त्यांच्यावर साेपवण्यात आलेली जबाबदारी चाेख पार पाडावी, असे निर्देश दिले.