टाचेवर सातत्याने अधिक भार पडला की दुखणे वाढते हे लक्षात घ्यायला हवे

    01-Oct-2026
Total Views |

Heel 
आपण खूप वेळ उभे राहिल्याने पायाच्या टाचेवर ताण येताे व ती दुखू लागते. याला प्लान्टर फेशिआटिस म्हणतात. गुडघे आणि पावले यांच्यावर आपल्या शरिराच्या वजनाचा संपूर्ण भार असताे. हा भार पेलता यावा यासाठी पावलांची रचना वक्राकार ठेवण्यात आली आहे.
 
वयानुरुप टाचांची दुखणी वाढतात. ती अचानक का उद्भवतात, याचे नेमके कारण सांगता येणे कठीण असले, तरीही पायावर शरिराच्या संपूर्ण वजनाचा भार येऊन टाचदुखी वाढते. आपल्या टाचेच्या हाडापासून ते चवड्यापर्यंत एक जाडसर स्नायूंचा पडदा ताणून बसवलेला असताे, त्यालाच प्लान्टर फेशिआ म्हणतात, या फेशिआकडून स्प्रिंगसारखे काम हाेत असते, शरिराचा पावलांवर पडणारा भार हलका हाेण्यास त्यामुळे मदत हाेते.
 
चालताना पावलांची वेडीवाकडी हाेणारी हालचालही त्यामुळे सुलभ हाेते. असे असले तरी, त्या स्नायूच्या भार पेलण्यावर टाचेच्या काही मर्यादा असतात. टाचेवर सातत्याने अधिक भार पडला वा दाब येत राहिला किंवा काही कारणाने त्याला इजा झाली, तर या स्नायूच्या टाचेच्या बाजूच्या भागाला सूज येऊ लागते. यालाच वैद्यकीय भाषेत प्लान्टर फेशिआयटिस असे म्हणतात.
याच सुजेमुळे सुमारे पेशंटमध्ये टाचेच्या हाडाची वाढ हाेऊन कल्केनिअल स्पर हाेताे.
 
अनेकदा पेशंटच्या टाचेच्या आतील बाजूला दुखण्याने आजाराची सुरुवात हाेते. काेणतीही हालचाल करताना किंवा चालणे सुरू करताच टाचेमधून असह्य कळ येते. काही काळ चालल्याने बरे वाटते. यावर वेळीच उपचार न घेतल्यास संपूर्ण टाच दुखणे, पुढे चवड्यांपर्यंत दुखत राहणे, घाेट्याच्या मागील भागाला रग लागणे, हा त्रास बळावताे. दुखण्याच्या कालावधीमध्ये वाढ हाेते. कधीकधी ही टाचदुखी दिवसभर राहते.