श्री दासबोध नित्यपाठ-

अत्यंत लोधला पापिणी। अविद्येने भुलविला ।।१।।

    01-Oct-2026
Total Views |

RamdasSwami 
नवीन लग्न झालेल्या पुरुषाचे सगळे जग जणू त्याची पत्नी व्यापून टाकते. जसा एखादा माेठा ढग आला की आकाशातील तारेसुद्धा दिसेनासे हाेतात तसे पत्नीच्या अस्तित्वासमाेर इतर सर्वांची आठवणही झाकाेळून जाते. घरात आईवडील, भाऊ बहिणी असूनही जर पत्नी नसेल तर त्याचे मन लागत नाही व ताे खिन्न हाेताे. कामवासना आणि माेह या अविद्येमुळे ताे पूर्णपणे त्या विकारांच्या आधीन हाेताे.
 
पत्नीशिवाय त्याला काहीही गाेड वाटत नाही. ती जरा दृष्टिआड झाली तरी याचा जीव कासावीस हाेताे. त्याची सर्व प्रीती पत्नीवर केंद्रित हाेते. तिचे बाेलणे, हसणे, नेत्रपल्लवी, सुंदर चेहरा यामध्येच जगातले सगळे सुख सामावले आहे, असे त्याला वाटत राहते. तिच्यावाचून जगात काहीही सत्य नाही आणि आपले काेणीही नाही, अशी त्याची भ्रमलेली चित्तवृत्ती हाेऊन जाते.
 
आपण आपल्या भाेवताली पाहिले तर आजही नवविवाहित पतीपत्नी असेच वागताना आपल्याला दिसतात. त्यांना आपल्याशिवाय इतरांचे भानही नसते.
 
एखाद्या अगदी कुशल कथालेखकाप्रमाणे श्रीसमर्थांनी त्या पुरुषांच्या मनाची आंदाेलने, हेलकावे, पत्नीप्रेमामुळे झालेला नादावलेपणा येथे वर्णन केला आहे. ते म्हणतात त्याला पत्नीचा वियाेग हाेईल म्हणून घराबाहेरही जायला व आपला उद्याेगव्य999वसाय करायला नकाेसे वाटते.
 
कामधंद्यानिमित्त जर घराबाहेर गेलाच तरी त्याचे मन सारखे घरी पत्नीकडेच ओढ घेत असते. त्याला तिची क्षणाेक्षणी आठवण येऊन ताे व्याकुळ हाेत असताे.
 
पत्नीही पतीला तुम्हीच माझे जीव आहात म्हणून आपल्या लाघवाने पूर्णपणे अंकित करून टाकते. त्यामुळे हा माेह आणि कामवासना यामुळे त्याचा सर्व विवेक व विचार संपून जाऊन ताे एकापरीने पत्नीच्या हातचे खेळणे हाेऊन तिचा गुलाम बनताे.