मुंबई, 30 सप्टेंबर (आ.प्र.) :
देशाच्या युवा श्नतीला राेजगारक्षम बनवण्यासाठी शिक्षणासाेबत काैशल्य विकास, प्रशिक्षण आणि राेजगाराची सांगड घालणे आवश्यक आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, बदलत्या तंत्रज्ञानानुसार (एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम कम्प्युटिंग) काैशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.
28हून अधिक देशांत मनुष्यबळाची माेठी मागणी असून, राज्यातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर राेजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
श्रीमती नाथीबाई दामाेदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काैशल्य विकास विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय महाराेजगार मेळाव्याचा काेकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांत ऑनलाइन प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बाेलत हाेते. काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. हेमलता बागला, काैशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. अपूर्वा पालकर, काैशल्य विकास साेसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयु्नत डाॅ. अमित सैनी, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गाेयल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राज्यभरातून ऑनलाइन व प्रत्यक्ष हजाराे विद्यार्थी यावेळी उपस्थित हाेते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे राेजगार मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहिदा परमाणिक यांना क्रेवा कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. बेलापूर व कांती शंभू चव्हाण यांना क्रेवा कॅपिटलच्या कुर्ला शाखेसाठी कंपनीकडून नियु्नतीपत्र देण्यात आले. लाेढा, पाटील, रावल यांनी मनाेगत व्य्नत केले.
काेकण व नाशिक विभागातील 12 जिल्ह्यांत राेजगार मेळावे आयाेजिण्यात आले आहेत. आतापर्यंत 1500 पेक्षा अधिक उद्याेजकांनी आणि एक लाखापेक्षा अधिक इच्छुक युवक-युवतींनी राेजगार महाकुंभासाठी नाेंदणी केली आहे. सहभागी उद्याेजकांकडून 25000 पेक्षा अधिक पदांची मागणी नाेंदवल्याची माहिती यावेळी देण्यात आली.