मुंबई, 30 सप्टेंबर (आ.प्र.) :
‘आयुर्वेद ही देशाची प्राचीन आणि अमूल्य ज्ञानपरंपरा असून, या ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशाेधन, क्लिनिकल पडताळणी आणि नवाेन्मेषाची जाेड देऊन आयुर्वे दाला जागतिक स्तरावर प्रभावी स्थान मिळवून देणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. विश्व आयुर्वेद परिषदेच्या वतीने आयाेजित आयुर्वेद दिनानिमित्त एकदिवसीय वैज्ञानिक परिसंवादात राज्यपाल बाेलत हाेते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, रणजित पुराणिक, माजी महापाैर डाॅ. शुभा राऊळ, राज्यपालांचे सचिव डाॅ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. व्यंकट गिते, विश्व आयुर्वेद परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष डाॅ. विनायक तायडे आदी यावेळी उपस्थित हाेते. आयुर्वेद हा निराेगी जीवनशैलीचा मार्ग आहे. आयुर्वे दाला आधुनिक संशाेधन व तंत्रज्ञानाशी जाेडून देशातील आराेग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे जाधव यांनी सांगितले. आयुर्वेद शिक्षण, संशाेधन, काैशल्यविकास आणि आंतरराष्ट्रीय प्रसारासाठी विविध उपक्रम राबवण्याची गरज नाईक यांनी व्य्नत केली. डाॅ. तायडे यांनी मनाेगत व्य्नत केले. यावेळी राज्यपालाच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.