राज्यात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (चाैथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (सातवी) 26 एप्रिलला राज्यात एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.या परीक्षेची अधिसूचना राज्य परीक्षा परिषदेच्याwww.mscepune.in आणि https://puppssmsce. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.शासनमान्य शाळांमधून 2025- 26 या शैक्षणिक वर्षात चाैथीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व सातवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट हाेण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी 2 फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी देण्यात आला असून, विलंब, अतिविलंब आणि अति विशेष विलंब शुल्कासह 28 फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर काेणत्याही स्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.