पेण येथे पुष्परचना कार्यशाळा संपन्न

    08-Jan-2026
Total Views |
 
 

Pen 
 
पेण (रायगड) येथे फ्लाॅवर अँड बुके आर्ट ग्रुप डाेलवी, पेण जिल्हा रायगड यांच्यावतीने एक दिवसाची पुष्परचना कार्यशाळा आयाेजित केली हाेती.या कार्यशाळेमध्ये चिंचवड-पुणे येथील स्नेह फ्लाेरिस्ट संचालक व इंडिया फ्लाॅरिस्ट असाेसिएशनचे समन्वयक पंढरीनाथ म्हसके यांनी प्रात्यक्षिकांसह पुष्परचनेचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत त्यांनी विविध प्रकारची फुले कशी खरेदी करावीत? ती जास्त दिवस कशी टिकवावी? पुष्परचनेची काही मूलभूत तत्त्वे व नियम यांची माहिती दिली. तसेच विविध आकाराच्या टेबलवर ठेवण्याच्या पुष्परचना, पुष्पपात्रातील व फ्लाॅवर िेीं मधील सजावट, वेगवेगळ्या प्रकारचे बुके कसे बनवायचे यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.नंतर सहभागींकडून सराव करून घेतला. प्रशिक्षणानंतर सर्वच सहभागींनी स्किल डेव्हलपमेंटसाठी आयाेजित केलेल्या या कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यात अशा प्रकारच्या आणखी कार्यशाळा घेण्याची इच्छा समन्वयक स्वप्निल पाटील यांनी व्यक्त केली.