राज्य सरकारने कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी धाेरणात्मक निर्णय म्हणून महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धाेरण 2025-2029 जाहीर केले आहे. या धाेरणांतर्गत मुंबईत फेब्रुवारीत प्रथमच जागतिक कृषि कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन आयाेजिण्यात आले आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे.रब्बी, खरीप हंगामांमधील विविध पिकांसह फळपिकांची राज्यात माेठी वैविध्यता आहे. द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, माेसंबी, हापूससह बाेर, स्ट्राॅबेरी, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद आदी फळांचेही उत्पादन घेतले जाते. हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्ती, मनुष्यबळाची कमतरता. खते, रासायनिक औषधांमुळे उत्पादन खर्च वाढत आहे.
वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत आर्थिक उत्पन्नात वाढ हाेत नसल्यामुळे शेती ताेट्याची ठरत आहे.या पार्श्वभूमीवर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, हवामानाच्या अचूक अंदाजासाठी राज्य सरकारने 24 जून 2025 राेजी महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धाेरण 2025-2029 जाहीर केले आहे.त्या अंतर्गत 22 व 23 फेब्रुवारीस मुंबईत जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचे आयाेजन करण्यात आले आहे. या परिषदेत जगभरातील विचारवंत, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, स्टार्टअप्स आणि संशाेधन संस्था सहभागी हाेणार आहेत.तसेच, विविध देशांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उत्पादक संघटनांचाही सक्रिय सहभाग असणार आहे. या धाेरणांतर्गत दरवर्षी अशा परिषदेचे आयाेजन करण्यात येणार आहेत, असे भरणे यांनी सांगितले