ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वताेपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.मंत्रालयात राज्य ग्रंथालय परिषदेची पहिली बैठक झाली.यात पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित सहभागी झाले हाेते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगाेपाल रेड्डी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त राम लिप्ते, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग उपसचिव तुषार महाजन, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अमाेल मुत्याल, ग्रंथालय संचालक अशाेक गाडेकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन काेटेवार, ग्रंथालय संघ अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, ग्रंथालय संघ मराठवाडा विभागाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, पुणे विभागाचे अध्यक्ष साेपान पवार, काेकण विभागाचे अध्यक्ष दिलीप काेरे, डाॅ. सिद्धी जगदाळे, डाॅ. सुभाष चव्हाण, सुनील वायाळ व संबंधित अधिकारी उपस्थित हाेते. राज्य मध्यवर्ती ग्रंथालय व 6 विभागीय ग्रंथालयांत फिरते ग्रंथालय सेवा देणे याेजना प्रायाेगिक तत्त्वावर सुरू करणे, तसेच ई- लायब्ररी, ई लायब्ररी युनिक डेटाबेस, फिरते वाचनालय आदींवर चर्चा झाली.