सुखद स्मृतींच्या प्रकाशात पुढे जा

    07-Jan-2026
Total Views |
 
 

happy 
काही वर्षांपूर्वीपर्यंत मला या गाेष्टीची जाणीव नव्हती की जुन्या सुखद आठवणी जगणे मला आतून किती शांत करते. मला माहीत आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या बालपणीच्या आठवणी सुखद नसतात.बऱ्याच जणांसाठी जीवनाची सुरुवातीच्या आठवणी दु:ख व भयाने भरलेल्या असतात. त्यामुळे बरेचजण जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्यासाठी सुखद भवनिक क्षण शाेधून घेतता. उदा. पहिले घर, लायब्ररीचा एक शांत काेपरा वा माेठे झाल्यावर एका आवडत्या खूर्चीतून काहीही त्यांना भावनिक रुपात शांत करण्याचे काम करू शकतात.भावनिक आठवणींचे महत्त्व माझ्यासाठी जुन्या आठवणींचा अर्थ भूतकाळात जगण्याची इच्छा ठेवणे नाही. फक्त मी आपल्या आठवणींच्या त्या सुखद थैलीला वर्तमानात साेबत ठेवणे पसंत करते. तिला पाहून मला जाणीव हाेते की, खरे सुख काय आहे आणि हा अनुभव मी आजही जाणवू शकत.
 
मनाला मिळेल सुख ना आपण भूतकाळात परत जाऊ शकताे आणि ना असे करण्याची काेणतीही गरज असते., पण आपण त्या आठवणी अवश्य जाणवू शकताे. ज्या सध्याच्या काळात आपल्याला आनंद व पूर्णत्वाची जाणीव देत हाेत्या. काहीजणांसाठी या बालपणीच्या सुखद आठवणी असू शकतात तर काहींसाठी बालपणीच्या त्रूटी पूर्ण करण्याची भावना असू शकते.पण जुन्या आठवणींमध्ये परतणे वर्तमानात स्थैर्य जाणवण्यासाठी महत्त्वाचे आहे. दरवेळी असे करताना आपल्याला शांती लाभते. आपण आपल्या जुन्या स्वत:ला पुन्हा भेटू शकताे.काही काळापूर्वी माझी मुलगी हाॅस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट हाेती. एक दिवस तिच्या उशाशी बसून मी फाेन पाहात हाेते. ताेच माझे लक्ष एका अशा खेळण्याकडे गेले जे लहानपणी माझ्याकडे हाेते.अचानक माझ्या आठवणींची सारी दारे उघडू लागली. मी इंटरनेटवर आपल्या बालपणीची खेळणी शाेधू लागले. ताे अनुभव अत्यंत सुखद व परिचयाचा हाेता, ज्यात मुलायम गाेधडीची ऊब हाेती.
 
आज माझ्याकडे आपल बालपणासारखी अनेक खेळणी आहेत. रात्रीच्या वेळी मी आपल्या बालपणीचा लाकडी लॅम्प पेटवून सुखद ऊब जाणवते. या गाेष्टी फक्त शाेभेचे सामान नसूनमाझ्या भावना सांभाळून ठेवण्याचे माध्यम आहे.अशाप्रकारे भूतकाळात शिरा
 
 सुखद भावुक आठवणी ओळखा :आपल्या भूतकाळातील सर्वांत सुंदर क्षणांसंबंधित रंग, गंध व आवाजांविषयी विचार करा. जर बालपण सुखद नसेल तर इतर सुखद क्षणांचा विचार करा. आपल्याला सर्वांत जास्त काय आठवते? स्वयंपाकघरातील वास, एखादे आवडते गाणे वा एखादी मऊ मुलायम गाेधडी.
 
 छाेट्यापासून सुरुवात करा : भूतकाळातल सुखद आठवणी आपल्या वर्तमानात सामील करण्याचा अर्थ माेठ्या महागड्या वस्तू खरेदी करणे नव्हे. एखादे जुने गाणे, बालपणाची आठवण देववणारा एखादा सुगंध वा त्या काळाशी संबंधित खादा काॅफी मग असे काहीही असू शकते. या वस्तू अशा जागी ठेवा जिथे आपण यांना नेहमी स्पर्श करू शकाल. आपल्याला यामुळे किती शांती मिळते हे आपण जाणवू शकाल.