घाेरणे हे आजाराचे लक्षण असू शकते

    05-Jan-2026
Total Views |
 
 

health 
घाेरणे हे आजाराचे लक्षण असू शकते आणि हा आजार अगदी जीवघेणाही ठरू शकताे, हे किती जणांना माहीत आहे? ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया’ (ओएसए) हा झाेपेशी संबधित विकार आहे. लठ्ठ व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते. काही लाेकांमध्ये झाेपल्यावर वरच्या वायुमार्गात तात्पुरता अडथळा निर्माण हाेताे. या अडथळ्यामुळे त्यांचा श्वास तात्पुरता थांबताे.अरुंद झालेल्या श्वासमार्गाच्या कंपनामुळे घाेरण्याचा ध्वनी उत्पन्न हाेताे. वायुमार्गातील अडथळ्यामुळे झाेपेदरम्यान वारंवार घाेरणे किंवा श्वासासाठी तडफडदेखील हाेते; यामुळे रात्रीच्या झाेपेवर परिणाम हाेताे. रात्री शांत झाेप हाेत नसल्याने दिवसा झाेप येते.दिवसा डुलकी येणे, काम करतानाही झाेप येणे ही लक्षणे दिसतात. वाहन चालवताना झाेप आली, तर अपघातही हाेऊ शकताे. ‘स्लीप अ‍ॅप्निया’ नसलेल्या लाेकांच्या ुलनेत ‘स्लीप अ‍ॅप्निया’असलेल्या लाेकांमध्ये वाहन अपघात हाेण्याची शक्यता दुपटीने वाढते. घाेरण्यासह पुढील लक्षणे दिसून आल्यावर डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
 
लठ्ठपणामुळे ‘ओएसए’चा धाेका वाढताे वरच्या श्वसनमार्गाभाेवती साठलेली चरबी श्वास घेण्यास अडथळा आणू शकते. ज्यांचे वजन कमी/ याेग्य प्रमाणात आहे, त्यांनाही ङ्गस्लीप अ‍ॅप्नियाफ असू शकताे.अरुंद श्वासनलिका/लहान हनुवटी, माेठी जीभ/माेठी टाॅन्सिल, अ‍ॅडिनाॅइड ग्रंथी आदी रचनात्मक गाेष्टींमुळेही हा विकार हाेऊ शकताे. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते.धूम्रपान/मद्यपानासारख्या सवयी उच्च रक्तदाब, मधुमेह, दीर्घकालीन फुप्फुसांच्या समस्या, काही हार्माे नल डिसाॅर्डरमुळेदेखील ही जाेखीम वाढू शकते.हा आजार फक्त घाेरणे, अपुरी झाेप, दिवसा जास्त झाेप येणे एवढ्यापुरताच मर्यादित नाही. यामुळे रक्तदाब वाढणे, गाेळ्या घेऊनही रक्तदाब नियंत्रणात न येणे, हृदयविकाराचा झटका, पक्षाघाताचा झटका (स्ट्राेक), मधुमेहाचा धाेका, मानसिक नैराश्य, अचानक झाेपेत मृत्यू असे परिणामही हाेऊ शकतात; म्हणूनच या आजाराचे याेग्य निदान हाेणे व त्यावर लवकरात लवकर उपचार करणे महत्त्वाचे आहे.