मुंबई वन अ‍ॅपला मुंबईकरांची माेठी पसंती

    31-Jan-2026
Total Views |

Mobail
 
 
 
 
मुंबई, 30 जानेवारी (आ.प्र.) : एकात्मिक तिकीट प्रणाली अंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या (एमएमआरडीए) मुंबई वन अ‍ॅपला प्रवाशांची पसंती मिळत आहे. हे अ‍ॅप कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत या अ‍ॅपवरून 27 लाख 82 हजार तिकिटांची खरेदी करण्यात आली.

पाच लाखांहून अधिक प्रवाशांनी नाेंदणी केली आहे. केवळ साडेतीन महिन्यांत 27 लाखांहून अधिक तिकिटांची खरेदी या अ‍ॅपवरून झाली आहे. मुंबईतील चारही मेट्राे मार्गिकांवरील प्रवाशांसह उपनगरीय रेल्वे, बेस्ट आणि नवी मुंबई मेट्राे मार्गिकेवरील प्रवाशांकडून या अ‍ॅपचा वापर केला जात आहे.

मुंबईत सध्या घाटकाेपर-अंधेरी-वर्साे वा मेट्राे, दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्राे अ, दहिसर ते गुंदवली मेट्राे आणि आरे ते कफ परेड भुयारी मेट्राे या चार मेट्राे मार्गिका सेवेत आहेत. या मेट्राे मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी मेट्राे प्रवाशांना वेगवेगळे तिकीट खरेदी करावे लागत हाेते, तर बेस्ट, रेल्वेने प्रवास करतानाही वेगळे तिकीट खरेदी करावे लागत हाेते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ जात हाेता.
राज्य सरकारने एमएमआरडीएला एकात्मिक तिकीट प्रणाली अंतर्गत रेल्वे, बेस्ट, माेनाे, मेट्राेसह अन्य वाहतूक व्यवस्थेसाठी एकच स्मार्ट कार्ड आणि अ‍ॅप तयार करण्याची सूचना केली हाेती.

त्यानुसार एमएमआरडीएने मुंबई वन कार्ड आणि मुंबई वन अ‍ॅप तयार केले. हे अ‍ॅप ऑक्टाेबर 2025 मध्ये कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर मुंबईतील चार मेट्राे मार्गिकांसह नवी मुंबई मेट्राे मार्गिकेवरील प्रवाशांनी बेस्ट, उपनगरीय रेल्वेसाठी या अ‍ॅपचा वापर सुरू केला. अ‍ॅप सेवेत दाखल झाल्यापासून अवघ्या साडेतीन महिन्यांत अ‍ॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

मुंबई वन अ‍ॅप सेवेत दाखल झाल्यापासून ऑक्टाेबर ते जानेवारीपर्यंत या अ‍ॅपवरून 27 लाख 82 हजार तिकिटांची खरेदी झाली आहे. पाच लाख प्रवाशांनी अ‍ॅपवर नाेंदणी केली आहे. मुंबई मेट्राे आणि 7 मार्गिकेसाठी 7 लाख 68 हजार 248 तिकिटांची, मेट्राे 3 मार्गिकेवरून 7 लाख 39 हजार 977 तिकिटांची, मेट्राे 1 मार्गिकेवरून 7 लाख 26 हजार 714 तिकिटांची, नवी मुंबई मेट्राे मार्गिकेवरून 89745, उपनरीय रेल्वेवरून 3 लाख 93 हजार 464 तिकिटांची, तर बेस्टमधून प्रवास करणाऱ्यांनी 48387 तिकिटांची खरेदी झाल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.