सरत्या वर्षाला निराेप देत जल्लाेष, फटाके आणि गाेंगाटाऐवजी भ्नती, शांतता आणि अध्यात्माच्या वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्याची अनाेखी संधी यंदा ठाणेकरांना मिळाली. 31 डिसेंबरच्या रात्री तलावपाळी परिसरात आयाेजिण्यात आलेल्या भव्य गंगा आरतीमुळे संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला हाेता. मंत्राेच्चार, शंखनाद, दिव्यांचा प्रकाश आणि भ्नितभावामुळे तलावपाळी परिसरात उपस्थितांना काही काळ काशी-हरिद्वारसारखी आध्यात्मिकअनुभूती घेता आली. हर हर गंगे आणि हर हर महादेवच्या घाेषणांनी परिसर दुमदुमून गेला हाेता श्री काैपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाने या गंगा आरतीचे आयाेजन केले हाेते. वर्षअखेरीस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यात विविध कार्यक्रम हाेत असले तरी भ्नितमय वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्याचा हा उपक्रम नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारला.
त्यामुळे या परिसरात रात्री भाविकांची अलाेट गर्दी झाली हाेती.दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला तलावपाळी येथे दीपाेत्सव आणि गंगा आरतीची परंपरा असून, यंदा ही परंपरा जपत नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही आरती करण्यात आली. सायंकाळी सातला आरतीला सुरुवात झाली. पारंपरिक वेशात सजलेले वाराणसीचे अनुभवी पंडित विधी पार पाडत हाेते. शंखनाद, घंटानाद आणि मंत्राेच्चारांच्या गजरात आरती सुरू असताना उपस्थित भाविक भ्नितभावात तल्लीन झाले हाेते. हातात पंचारती दिवे, समाेर प्रज्वलित केलेले दीप यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला हाेता. हे दृश्य पाहण्यासाठी ठाणे शहरासह आसपासच्या भागांतूनही नागरिकांनी गर्दी केली हाेती.
अनेकांनी हा क्षण माेबाइल कॅमेऱ्यांनी टिपला.आरतीनंतर हर हर गंगे आणि हर हर महादेवच्या घाेषणांनी परिसर दुमदुमून गेला.फटाक्यांच्या गाेंगाटाऐवजी भ्नतीभावात आणि शांत वातावरणात नववर्षाचे स्वागत केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्य्नत हाेत हाेते. अनेक कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण माेठ्या श्रद्धेने या आरतीत सहभागी झाले हाेते. पर्यावरणपूरक आणि आध्यात्मिक पद्धतीने नववर्ष साजरे करण्याचा हा उपक्रम ठाणेकरांसाठी सकारात्मक संदेश देणारा ठरला.