आकाशवाणीवर निवडणूक आयु्नत वाघमारे यांची मुलाखत

    03-Jan-2026
Total Views |
 
 

Interview 
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः महापालिका, नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयाेगाने केलेली तयारी, नियाेजन; तसेच मतदारांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययाेजनांची सविस्तर माहिती देणारी राज्य निवडणूक आयु्नत दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमांतून प्रसारित हाेणार आहे.राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या या मुलाखतीत सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्दे शांनुसार निवडणुका वेळेत व सुरळीत पार पाडण्यासाठी आयाेगाकडून व्यापक नियाेजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदान केंद्रांची संख्या, ईव्हीएम उपलब्धता, दुबार मतदारांबाबत घेतली जाणारी दक्षता, तसेच मतदारांसाठी विकसित केलेल्या ‘मताधिकार’ माेबाइल अ‍ॅपमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
 
मतदानाच्या दिवशी मतदारांना काेणताही त्रास हाेऊ नये, यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक साेयीसुविधा; तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था, मतदान ट्नका वाढवण्यासाठी राबवण्यात येणारे विविध मतदार जागृती उपक्रम यावरही त्यांनी प्रकाश टाकला.मुलाखतीच्या शेवटी वाघमारे यांनी या कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व मतदारांना लाेकशाहीच्या या महत्त्वपूर्ण उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी हाेण्याचे आवाहन केले. निवेदिका स्मिता गव्हाणकर यांनीी मुलाखत घेतली आहे.दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत शनिवारी (3), साेमवारी (5) आणि मंगळवारी (6 जानेवारी) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित हाेणार असून, न्यूज ऑन एआयआर या माेबाइल अ‍ॅपवरही ऐकता येईल.जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारी (6 जानेवारी) रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित हाेईल. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही ही मुलाखत पाहता येईल.