आपण समजत असताे, की ज्या सर्व गाेष्टी आपल्यापर्यंत येतात त्या परिस्थितीमुळे व इतरांमुळे येत असतात. तसेच जेव्हा आनंदही येताे तेव्हा ताेही काेणत्या ना काेणत्या परिस्थितीमुळे वा व्यक्तीमुळेच येताे. समजा दाेन व्यक्तींचे आपसात भांडण झाले आहे. ही एक परिस्थिती आहे, जी बाहेर आहे, पण शब्द ऐकल्यानंतर मनात जे काही चालू हाेते ते आपल्या मर्जीने हाेत असते. जर हे समीकरण आपण जीवनात अवलंबले तर आपले संपूर्ण जीवन पूर्णपणे बदलून जाईल. ऑफिसात बाॅसने दहा जणांना एकच गाेष्ट सांगितली. परिस्थिती दहा लाेकांसाठी एकसारखीच आहे. त्यांचे बाेलणे ऐकून दहा जणांचे जे विचार चालतील तेही एकसारखेच असतील का? परिस्थिती एक, व्यक्ती एक, गाेष्ट एक, तिचे ऐकल्यानंतर दहा लाेक जाे विचार करतील ते एकसमान नसतील. मी कसा विचार करायचा हे मी ठरवीन.परिस्थितीत आपण जसा विचार करू तसे आपल्याला जाणवेल. पण दिवसभरात आपण कितीदा असे बाेलत असताे की, याच्यामुळे आपल्याला राग आला आहे, याच्यामुळे मी दु:खी आहे. याच्यामुळे मी सुखी आहे.
मला वाटते की माझ्या मनाचा कंट्राेल बाहेर आहे. कारण इतरांचे बाेलणे, इतरांचे वागणे, इतरांची परिस्थिती माझ्या मनावर कंट्राेल करू लागली आहे. मला आनंदी आणि शांत राहायचे आहे यासाठी मी इतरांना बदलण्याचा प्रयत्न करीत असताे पण आपल्याला हेही माहीत असते की, आपण इतरांना बदलू शकत नाही.मेडिटेशन आपल्याला जीवनातील एक साेपी गाेष्ट शिकवते. ती म्हणजे परिस्थिती बाहेरून येणार आहे त्या परिस्थितीसमाेर आपल्याला काही विचार करावयाचा असेल तर ताे कसा करावयाचा हे माझ्यावर अवलंबून आहे.समजा एखाद्या मीटिंगमध्ये एखाद्याचा माेबाइल वाजला पण ती रिंगटाेन ऐकल्यानंतर सर्वांच्यामनात वेगवेगळे विचार चालू हाेतात. काेणी म्हणताे इट्स ओके, काेणी म्हणते याला एवढेही समजत नाही का की एवढी महत्त्वाची मीटिंग चालू आहे. फाेन तर 5 सेकंद वाजून बंद झाला पण मनात आणखी एक रिंगटाेन सुरू हाेते. याचे काय करावे. याचे एखादे बटन आहे का?
राग येणे स्वाभाविक आहे हे खरे आहे. आपण इतरांना बदलायला सांगताे. पण आपण जेवढे इतरांना बदलायला सांगत असताे तेवढी आपण आपली शक्ती कमी करीत जात असताे. आपल्या मनाचा रिमाेट कंट्राेल दुसऱ्याच्या हातात जाताे. जसा की आपल्या टीव्हीचा रिमाेट शेजारच्यांच्या हातात आहे, तर त्यांच्या टीव्हीचा रिमाेट आपल्याकडे आहे. आता जे बटन ताे दाबेल ताे चॅनेल आपल्यालापाहावा लागेल व जे बटन आपण दाबू ते चॅनेल त्याला पाहावे लागेल.आज आपण जे जीवन जगत आहाेत ते काहीसे असेच आहे. जर मी आत्म्याचे ध्यान ठेवले नाही तर मला रागही येऊ शकताे वा डिप्रेशनही हाेऊ शकते. अन्यथा आपण 18 तास काम करूनही तणावमुक्त राहू शकताे कारण आपल्या मनाचा कंट्राेल आपल्याकडे आहे.मेडिटेशनच्या वेळी तर आपण शांत राहताे पण त्यानंतर मनावर नियंत्रण ठेवणे आपल्यालाच शिकायला हवे.