महावितरणची नवी व्यवस्था; वीज कनेक्शन त्वरित मिळणार

    03-Jan-2026
Total Views |
 

electricty 
 
ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महानगरांमध्ये तीन दिवसांत, शहरांमध्ये सात दिवसांत आणि ग्रामीण भागात 15 दिवसांत नवे वीज कनेक्शन देण्याच्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयाेगाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज कनेक्शनसाठी वाट पाहावी लागणार नाही, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्य्नत केला.महावितरणकडून मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात वीजपुरवठा केला जाताे. ग्राहकांना नव्या वीज कनेक्शनसाठी ऑनलाइन अर्ज करता येताे. अर्जासाेबत दाखलेही जाेडता येतात. अर्जाची वकागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर ग्राहकाला शुल्क भरण्याची सूचना दिली जाते.
 
ग्राहकाने पैसे भरले की, नवा मीटर जाेडून ग्राहकाला वीज कनेक्शन दिले जाते.सध्याची ही पद्धत अर्ज केल्यापासून नवे कनेक्शन दिल्याची यंत्रणेत नाेंद हाेण्यापर्यंत पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे.यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक टप्प्यावर देखरेख करण्यात येत आहे.त्यामुळे ग्राहकांना आयाेगाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत नवी जाेडणी मिळण्याचा विश्वास महावितरण प्रशासनाला वाटताे. या नव्या पद्धतीमुळे एकूण प्रक्रियेची गती वाढवणे शक्य झाले आहे.महावितरणची ही व्यवस्था 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे.