मंगलमूर्ती माेरया... गणपती बाप्पा माेरया...च्या जयघाेषात नूतन वर्षाचे स्वागत करत गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे 3 पासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी केली हाेती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने नूतन वर्षारंभानिमित्त मंदिराला आकर्षक पुष्परचना करण्यात आली हाेती. सकाळपासून अभिषेक शृंगार, सुप्रभात आरती, नैवेद्यम आरती, माध्यान्ह आरती, सायंकाळी महामंगल आरती आणि रात्री शेजारती करण्यात आली. यावेळी भाविक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. गुरुवारनिमित्त मंदिरात दैनंदिन अभिषेक, शिशू पूजन सेवा, वैय्नितक गणेश याग झाले. भाविकांनी यात माेठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अनेकांनी रस्त्यावरूनच ‘श्रीं’चे दर्शन घेत नवे वर्ष सुख समृद्धीचे जावाे, अशी प्रार्थना केली.