त्र्यंबकेश्वरमधून आजपासून स्वच्छता माेहिमेस प्रारंभ

    03-Jan-2026
Total Views |
 

clean 
 
नाशिक-त्र्यंबकेश्वरला हाेणारा कुंभमेळा स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक हाेण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे.3 जानेवारीस त्र्यंबकेश्वर शहरातून या स्वच्छता माेहिमेचा प्रारंभ हाेत असून, जास्तीत जास्त नागरिक, संस्थांनी सहभागी हाेऊन ही माेहीम यशस्वी करावी, असे आवाहन कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयु्नत शेखर सिंह यांनी केले.नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण सभागृहात आयाेजित बैठकीत आयु्नत बाेलत हाेते. यावेळी ‘निमा’चे अध्यक्ष आशिष नहार, क्रेडाईचे सचिव तुषार संकेलचा, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.दयानंद देशमुख, त्र्यंबकेश्वर शासकीयऔद्याेगिक संस्थेचे प्राचार्य डाॅ. एन.बी. गुरुळे, राहुल देशमुख, डाॅ. प्रफुल्ल कांबळे यांच्यासह विविध महाविद्यालये, शिक्षण संस्था, विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.
 
त्र्यंबकेश्वरमधून या स्वच्छता माेहिमेचा शनिवारी प्रारंभ हाेणार आहे.या माेहिमेत संगम घाट व गाैतम तलाव परिसर, वेताळ महाराज मंदिर परिसर,आखाडा पार्किंग परिसर, निवृत्ती महाराज चाैक, गाैतम तलाव पूल येथे विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे.या माेहिमेत शासकीय विभागांसह स्वयंसेवी संस्था, नागरी समाज संस्था व स्वयंसेवक गट, धार्मिक ट्रस्ट व सामाजिक संस्था, युवक व समुदाय- आधारित स्वयंसेवी संस्था, आराेग्य, पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन स्वयंसेवक, विद्यार्थी समिती, रहिवासी कल्याण संघ व स्थानिक स्वयंसेवक, ब्रह्मगिरी/त्र्यंबक परिसराला सहकार्य करणारे साहसी व ट्रेकिंग गट या सर्वांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
 
यापुढेही वेळाेवेळी राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता माेहिमांसाठी सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून निधी उपलब्धेसाठी संस्थांचे याेगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले.स्वच्छ कुंभसाठी अशा स्वच्छता माेहिमांचे आयाेजन यापुढेही केले जाणार आहे. शहरातील महाविद्यालये व उद्याेग संस्थांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता व देखभालीसाठी एखादा घाट दत्तक घेतल्यास तेथे वेळाेवेळी स्वच्छता राखता येईल.शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थांची स्वच्छता जनजागरूकता रॅली, पथनाट्य यासारखे उपक्रम राबवावेत. सेवभावी संस्थांना या स्वच्छता माेहिमेत सहभागी हाेणाऱ्या नागरिकांना स्वच्छता साहित्य उपलब्धेसाठी भरीव मदत करण्याचे आवाहनही शेखर सिंह यांनी केले.