महावितरणचा चित्ररथ ठरला संचलनाचे माेठे आकर्षण

    29-Jan-2026
Total Views |
 

rath 
प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कवर झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात महावितरणचा चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अन्नदाता ते ऊर्जादाता’ या संकल्पनेवर आधारित महावितरणच्या या चित्ररथाचे काैतुक केले.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशात साैर ऊर्जेला चालना देण्यासाठी व शेतकऱ्यांना शाश्वत व माेफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी ‘अन्नदाता ते ऊर्जदाता’ ही संकल्पना राबवली आहे. मुख्यमंत्र्यांनी मागेल त्याला साैर कृषीपंप याेजना व मुख्यमंत्री साैर कृषीवाहिनी याेजना 2.0च्या प्रभावी अंमलबजावणीतून राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा माेफत वीज उपलब्ध करून देत या संकल्पनेच्या पूर्ततेला गती दिली आहे.
या याेजनांमधून राज्यातील 45 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे.प्रजासत्ताकदिनी आयाेजित कार्यक्रमात चित्ररथाच्या माध्यमातून महावितरणने केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर पर्यावरणाभिमुख व समृद्ध महाराष्ट्राचे चित्र मांडले.देशातील पहिले साैरग्राम ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडीचा देखावा चित्ररथात लक्षवेधक ठरला.मुख्यमंत्री साैर कृषीवाहिनी याेजना 2.0 अंतर्गत 16 हजार मेगावाॅट क्षमतेचे साैर ऊर्जानिर्मिती प्रकल्प प्रस्तावित असून, आत्तापर्यंत 3300 मेगावाॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत.