जाेडीदारावर पाळत ठेवणे अयाेग्य

    02-Jan-2026
Total Views |
 
 
 

coup 
कुठल्याही नात्याच्या बांधणीत परस्परांवरील विश्वास हा मुख्य घटक असताे. विशेषतः पतीपत्नीच्या नाते तर विश्वासाच्या भक्कम पायावरच उभे असते. जेव्हा तुम्ही जाेडीदारावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अविश्वास दाखवायला लागता, पाळत ठेवू लागता तेव्हा त्या नात्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला वेळ लागत नाही. कारण निकाेप नात्यामध्ये पती-पत्नीचा परस्परांवर गाढ विश्वास असताे. परस्परांविषयीचा आदर, प्रायव्हसीचा हक्क, वैयक्तिक स्पेस यातून परस्परांचे एकमेकांवर विनाअट गाढ प्रेम असते. असे असले तरी जेव्हा दुसऱ्याच्या खासगी बाबींमध्ये डाेकावून पाहण, पाळत ठेवणे ही कुठल्याही नात्यामध्ये वाईटच असते.
 
त्याची कारणे...जेव्हा तुम्ही पाळत ठेवता तेव्हा तुमचाच स्वतःवर विश्वास नसताे ः नीट विचार केला तर जेव्हा आपण आपल्या नात्यातील व्यक्तीवर किंवा जाेडीदारावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करताे याचाच अर्थ आपला स्वतःवरच विश्वास नसताे.तुम्ही म्हणता की, माझा त्या व्यक्तीवर विश्वास नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवता तेव्हा तुमचा स्वतःवरच विश्वास नसताे.जाेडीदाराचे मेसेज, ई-मेल, साेशल मिडिया चेक करण्यातून तुम्ही स्वतःवर विश्वास नसल्याचे दाखवून देत असता. जेव्हा आपला स्वतःवर विश्वास नसताे तेव्हा आपण दुसऱ्यावर कसा काय विश्वास ठेवणार? आपल्या मनात संशय निर्माण झाला की आपण त्या संशयाचे पहिले बळी ठरत असताे. आपण प्रत्येककडे जर खलनायक म्हणून पाहायला लागलाे तर त्यातून आपण स्वतःलत्या प्रक्रियेतील बळी ठरवत असताे. असा बळी ज्याचा या जागतील सुरक्षिततेवर विश्वास नसताे.
ताे म्हणजे स्व-विश्वास आणि स्वतःवरील प्रेम.
 
संशयातून चिंता वाढते: जेव्हा तुम्ही जाेडीदाराचा ाेन किंवा साेशल मिडिया अकाऊंट चेक करता तेव्हा काहीही सापडले नाही तर तुम्ही आनंदी हाेता पण त्याचवेळी तुमच्या मनातून संशय गेलेला नसताे. मग प्रत्येकवेळी जाेडीदाराचे मेसेज चेक करण्याचा माेह हाेत राहताे. मग ही सवय बनून जाते. काही काळानंतर ही तुमची भावनिक सवय बनते. मग जाेडीदाराचे मेसेज चेक करता आले नाहीत तर चिंता वाढते.
 
जाेडीदाराच्या विश्वासाचा भंग: एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की दहापैकी सातजण जाेडीदाराचे मेसेज चेक करत असतात.त्यामध्ये पती, पत्नी, बाॅय्रेंड, गर्ल्रेंड यांचा समावेश हाेताे. जेव्हा तुम्ही दसऱ्याचे मेसेज चेक करता तेव्हा तुम्ही त्याच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असता. त्यातून त्याच्याविषयीचा अनादरही प्रकट हाेत असताे.
 
गुंतागुंत निर्माण हाेण्याची शक्यता: तुम्ही जेव्हा जाेडीदाराचा ाेन किंवा संगणक चेक करता तेव्हा त्यातून तुम्हांला कुटुंबातील वाद, त्याची जर्नल्स, इतर अनावश्यक माहिती, बँकेविषयीची माहिती, हिशेब अशा अनेक गाेष्टी दिसू लागतात. अशा स्थितीत कुटुंबात मतभेद आणि वाद नसले तरी तुम्हांला काही गाेष्टींची माहिती झाल्याने त्यातून नव्याने मतभेद आणि गुंतागुंत निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे अशा गाेष्टींपासून लांब राहणेच याेग्य ठरते.