साडेतीन श्नितपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंग गडावर जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत माेठे फेरबदल झाले आहेत. नांदूरी ते सप्तशृंग गड या घाट मार्गावर सुमारे दाेन महिने एकेरी वाहतुकीचे नियम लागू असणार आहेत.निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार एकावेळी एकाच दिशेने वाहतूक सुरू राहील आणि शेवटची गाडी पाेहाेचेपर्यंत विरुद्ध दिशेची वाहतूक थांबवलेली असेल.नांदुरी ते सप्तशृंग गड या साधारणत 10 कि.मी.च्या घाट मार्गावर काही टप्प्यात काॅंक्रिटीकरण व संरक्षक भिंत बांधणीचे काम प्रगतिपथावर आहे.
रस्त्याची अस्तित्वातील रुंदी मर्यादित आहे. तीव्र वळणे, चढ-उतार आणि मर्यादित दृश्यमानता असल्याने जेथे काम सुरू आहे, तेथे वाहतूक वळवणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. आगामी यात्राेत्सवापूर्वी रस्त्याचे काम सुस्थितीत आणण्यासाठी बांधकाम विभागाने या मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्थेची सूचना केली हाेती. त्यास कळवणच्या उपविभागीय अधिकारी डाॅ. कश्मिरा संख्ये यांनी मान्यता देत या संदर्भात आदेश काढले. प्रवासासाठी 30 मिनिटांची वेळ गृहीत धरून हे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आह