मुंबई पालिकेच्या मतमाेजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर

    17-Jan-2026
Total Views |
 

padu 
 
बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडच्या मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची माेजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी, अपवादात्मकरित्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयाेगाने स्पष्ट केले आहे.भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडची मतदान यंत्रे केवळ मुंबई पालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे केंद्रीय निवडणूक आयाेगाची असून, ती ‘एम3ए’ या प्रकारची आहेत.
 
त्यात झालेल्या मतदानाची मतमाेजणी कंट्राेल युनिटला(सीयू) बॅलेट युनिट (बीयू) जाेडूनच करावी. फक्त तांत्रिक अडचण आली, तरच अत्यंत अपवादात्मकरित्या पाडूचा वापर करावा, असे राज्य निवडणूक आयाेगाचे आदेश आहेत.मुंबई पालिका निवडणुकीसाठी 140 पाडूंची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मतमाेजणीसाठी पाडूची गरज भासल्यास कंपन्याच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत त्याचा वापर करावा. त्याचबराेबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयाेगाने दिले हाेते.