ग्रह-ताऱ्यांच्या कुंडलीत आता एआयचा शिरकाव

    17-Jan-2026
Total Views |
 

AI 
 
भारतातील ज्याेतिषशास्त्र आता फ्नत ग्रह-ताऱ्यांमध्ये लिहिलेले उरले नसून, ते अल्गाेरिदममध्ये काेड केले जात आहे. एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), देशातील ऑनलाइन ज्याेतिष बाजारपेठ वेगाने कायापालट करत आहे, परंतु ऑटाेमेशनला (स्वयंचलित प्रणाली) किती वाव द्यावा, यावर विविध प्लॅटफाॅर्ममध्ये दाेन गट पडले आहेत. ‘अ‍ॅस्ट्राेयाेगी’ आणि ‘इन्स्टाअ‍ॅस्ट्रा’ सारखे काही प्लॅटफाॅर्म ग्राहकांशी सुरुवातीच्या संवादासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी, अधिक प्रतिसादासाठी आणि ग्राहकांना याेग्य तज्ज्ञांशी जाेडण्यासाठी ‘बॅकएंड’ सहायक म्हणून एआयचा वापर करत आहेत.दुसरीकडे, ‘अ‍ॅस्ट्राेसेज’ सारखे प्लॅटफाॅर्म त्याच्याही पुढे गेले असून, त्यांनी ‘एआय ज्याेतिषी’ तयार केले आहेत, जे एकाच वेळी हजाराे ग्राहकांशी संवाद साधतात आणि खूप उत्पन्न मिळवून देतात. ‘अ‍ॅस्ट्राेसेज’ अ‍ॅपवरील 7,65,000 हून अधिक फाॅलाेअर्स असलेले ‘मिस्टरकृष्णमूर्ती’ हे एआय ज्याेतिषी याचे एक माेठे उदाहरण आहेत.
 
‘केपी (कृष्णमूर्ती पद्धती) ज्याेतिषशास्त्रातील 31 वर्षांचे अनुभवी’ म्हणून ओळखले जाणारे हे एआय एकाच वेळी 1,000 ग्राहकांना हाताळू शकतात. ते ‘अ‍ॅस्ट्राेस’मधील अशा 25 एआय ज्याेतिषांपैकी एक आहेत, जे ज्याेतिषांना माेठी स्पर्धा देत आहेत.अ‍ॅस्ट्राेसेज-जीईएआयचे संस्थापक पुनीत पांडे म्हणतात की, ‘त्यांच्या एआय महसुलात दरमहा 20% वाढ हाेत आहे आणि अवघ्या 16 महिन्यांत त्यांच्या एकूण व्यवसायात एआयचा वाटा 25% झाला आहे. त्यांचे एआय ज्याेतिषी लार्ज लँग्वेज माॅडेल्स (एलएलएम) आणि अवतार तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि त्यांना वैदिक, लाल किताब, पाश्चात्त्य अशा ज्याेतिष पद्धतींचे प्रशिक्षण दिले गेले आहे. व्यवसायाच्या दृष्टिकाेनातून, एआय ज्याेतिषी एकाच वेळी असंख्य काॅल आणि चॅट्स हाताळतात, जे अधिक फायदेशीर ठरते.’ एआय सहायक म्हणून : इतर काही प्लॅटफाॅर्म मात्र एआयचा वापर केवळ एक सहायक साधन म्हणून करत आहेत.त्यांच्या मते, मानवी संवेदना आणि माणसांतील संपर्क आजही अपरिहार्य आहे.
 
‘इन्स्टाअ‍ॅस्ट्राे’चे संस्थापक आणि सीईओ नितीन वर्मा म्हणतात की, ‘ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी एआयचा वापर करतात, पण एआय-आधारित ज्याेतिषासाठी पैसे घेत नाहीत. त्यांच्या मते, ज्याेतिषाला व्यक्तीच्या जीवनशैलीतील गुंतागुंत समजून घेणे आवश्यक असते.’ इन्स्टाअ‍ॅस्ट्राे ज्याेतिषांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी एआय टूल्स पुरवते. यात ज्याेतिषांना सखाेल माहिती मिळवून देणे किंवा ग्राहकांना दिलेल्या प्रतिसादाची भाषा अधिक संवेदनशील करणे याचा समावेश हाेताे.हे ‘रिअल-टाइम’मध्ये घडते, जर ज्याेतिषाचा विषय भरकटला असेल, तर त्याला पुन्हा मूळ प्रश्नावर येण्यासाठी एआय सूचना देऊ शकते.भविष्यात, इन्स्टाअ‍ॅस्ट्राे नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी एआय तैनात करण्याच्या विचारात आहे.
 
उदाहरणार्थ, हिंदी भाषिक ज्याेतिषाला इतर भाषांमध्ये संवाद साधण्यास सक्षम करणे किंवा वेगवेगळ्या देशांतील ग्राहकांशी सांस्कृतिकरीत्या जाेडले जाणे यामुळे शक्य हाेईल.‘अ‍ॅस्ट्राेयाेगी’ सारखे प्लॅटफाॅर्म एआयचा वापर ‘फर्स्ट-टच’ (सुरुवातीचा संपर्क)म्हणून करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला अ‍ॅस्ट्राेयाेगीने केलेल्या सर्वेक्षणात 10% लाेकांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या समस्यांसाठी एआयकडून उत्तरे मिळवण्यास हरकत नाही.या अभिप्रायाच्या आधारे, अ‍ॅस्ट्राेयाेगीने सुरुवातीच्या चाैकशीसाठी एआयचा वापर सुरू केला आहे, त्यानंतर ग्राहकाला याेग्य मानवी तज्ज्ञाशी जाेडले जाते. अ‍ॅस्ट्राेयाेगीचे मुख्य विकास अधिकारी आदित्य वर्मा म्हणतात, ‘केवळ 5% ग्राहकांना याचा अनुभव आला असला तरी ग्राहकांचा कल सकारात्मक आहे आणि यामुळे 30 ते 35% उच्च दर्जाच्या ज्याेतिष्यांना अधिक व्यवसाय मिळत आहे.’