केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयराेग निर्मूलन कार्यक्रम राबवण्यात येत असून, एआय आधारित हँड हेल्ड एक्स-रे तपासणीमुळे क्षयराेगाचा लवकर शाेध घेणे शक्य झाले आहे. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण 14080 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यातून 23 क्षयरुग्णांचा शाेध लागला आहे.यानंतर जिल्हा प्रशासनाकडून त्यांना याेग्य वेळी उपचार देण्यात आल्याची माहिती जिल्हा आराेग्य विभागाकडून देण्यात आली.हा कार्यक्रम जिल्हाधिकारी डाॅ.श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कैलास पवार, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. गंगाधर परगे आणि प्रभारी जिल्हा क्षयराेग अधिकारी डाॅ.दिनेश सुतार यांच्या नेतृत्वाखाली हाेत असून, शासकीय आराेग्य यंत्रणा, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, सामाजिक संस्थांच्या समन्वयातून ही माेहीम राबवली जात आहे.
जिल्ह्यातील क्षयराेग निर्मूलनासाठी एक वर्षाच्याकालावधीत व्यापक माेहीम राबवण्यात आली. जिल्हा आराेग्य विभागाकडून ही माेहीम सुरूच आहे.टीबीमु्नत भारत अभियान आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अतिजाेखमीच्या लाेकसंख्येची तपासणी माेठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. यासाठी एआय आधारित मशीनद्वारे गावाेगावी तपासणी शिबिरे आयाेजिण्यात आली. यातून 2493 व्य्नती संशयित आढळून आल्या.त्यापैकी 1937 जणांची थुंकी नमुना तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेमुळे संभाव्य रुग्णांची त्वरित ओळख हाेऊन त्यांना लगेच उपचार देणे शक्य झाले. दीर्घकाळ खाेकला, ताप, वजन घटणे, रात्री घाम येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय आराेग्य संस्थेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.