समृद्धी महामार्ग थेट इस्टर्न फ्री वेला जाेडणार

    15-Jan-2026
Total Views |
 
 

highway 
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून आमणे फाट्यापर्यंत जलदपणे पाेहाेचता येते. मात्र, पुढील प्रवास भिवंडीतील वाहतूक काेंडीमुळे वेळखाऊ ठरताे. त्यामुळे आमणे फाट्यावरून वाहनचालकांना थेट मुंबईत जलदपणे जाता यावे यासाठी रस्ता तयार करण्यात येणार आहे.आमणे फाट्याहून पूर्व मु्नत मार्गाला (इस्टर्न फ्री वे) जाेडणारा हा मार्ग तयार केला जात आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई प्रवास सव्वा दाेन तासांतच करता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या मार्गाचा उपयाेग नागपूरसह विविध जिल्ह्यांतून समृद्धी महामार्गाने प्रवाकरणाऱ्या वाहनचालकांना हाेणार आहे.नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर भिवंडी, ठाणे परिसरात माेठी वाहतूक काेंडी असते. भिवंडी परिसरातील गाेदामांमुळे अवजड वाहनांची माेठी वर्दळ असते. महामार्गाची दुरुस्ती व खाडी पुलाच्या कामांनी काेंडीत आणखीभर पडते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग भिवंडी तालुक्यातील आमणे येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला मिळताे.
 
आठपदरी समृद्धी महामार्गावरून भरधाव येणारे वाहनचालक चाैपदरी मुंबई-आग्रा महामार्गावर आमणेत पाेहाेचल्यावर काेंडीत अडकतात. महामार्गावरील आणि समृद्धी महामार्गावरील वाहने या ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे आमणेतही प्रचंड वाहतूक काेंडी हाेते.समृद्धी महामार्गावरून भिवंडीतून मुंबईकडे जाणे वाहनचालकांना जिकिरीचे ठरते आहे. हा प्रश्न साेडवण्यासाठी राज्य सरकारने नियाेजन केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आमणे फाट्यापासून थेट इस्टर्न फ्री वेला जाेडणारा मार्ग तयार केला जाणार आहे.यामुळे वाहनचालकांना थेट मुंबईत जलदपणे पाेहाेचता येईल. नाशिककरांना मुंबईत जाण्यासाठी सव्वा दाेन तास लागतील. त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.