गाेष्टी बालपणाचा अविभाज्य भाग असायला हवा. पुस्तकांतल्या नव्हे तर ऐकावयाच्या गाेष्टी ज्यामध्ये पुढे काय झाले विचारण्याची संधी असते आणि ज्यांच्या शेवटी विचारले जावे की या गाेष्टीतून काय शिकलात? एक गुरू एकेकाळी पुस्तकात राहात असे.त्याच्याकडे खूप सारे धडे असत. त्याशिवाय असत खूप साऱ्या गाेष्टी. टाेपी घालून राजासमाेर ऐटीत नाचणाऱ्या उंदराची गाेष्ट किती साधी हाेती. चिंधी सापडल्यानंतर ती घेऊन वेगवेगळ्या सामाजिक मदतगारांकडे हिंडणारा उंदीर कल्पनेच्या वेगळ्याच जगात घेऊन जात असे. फक्त उंदरावर व त्याला मदत करणाऱ्यांवर लक्ष ठेवणाऱ्याचे संवाद सहज पाठ हाेत असत. गाेष्ट जेव्हा कल्पनेत असते तेव्हा ऐकणाऱ्याचे विचार नियंत्रित ठेवते.
शब्द ज्या दिशेला नेतात लक्ष तिकडेच जाते. एखाद्याच्या बाेलण्यात फुलाचा उल्लेख आला तर फूल लक्ष वेधते. अन्यथा गाेष्ट चालू राहते. चित्रपटांचे स्वत:चे एक साैंदर्य असते पण गाेष्ट ऐकण्याचा वा गप्पागाेष्टींचा आनंद सर्वांहून वेगळा असताे.आपल्यालहानपणाच्या त्या गाेषटी काेठे गेल्या हे विचारण्यापेक्षा एक गाेष्ट आठवून तर पाहा. ती छाेट्या मुलांना ऐकवा. जेणेकरून ती ऐकायला नव्हे तर कल्पना करायलाही शिकतील. प्रश्न विचारायला शिकवा. विचार करा, हा आपला प्रयत्न किती छाेटा असेल आणि कितीतरी फायदे.या गाेष्टीतून आपल्याला हा धडा मिळताे वा ही गाेष्ट आम्हाला शिकवते की... यामुळे मजेमजेत चिमुकल्यांना जगण्याचा धडा मिळेल. चला तर गाेष्टी आठवू या.