पाणी आग कशी विझवते?

    13-Jan-2026
Total Views |
 
 

water 
उत्तर : आग पेटवण्यासाठी सगळ्यात प्रथम इंधन आवश्यक असते. म्हणजे लाकूड, गॅस, राॅकेल वगैरे आणखी प्राणवायूची गरज असते. म्हणजे इंधनाबराेबर प्राणवायूचा संयाेग झाला की आग पेटते. याचा अर्थ आग विझविण्यासाठी तीन गाेष्टी बाजूला केल्या पाहिजेत. प्रथम इंधन बाजूला केले पाहिजे. नंतर इंधनाचा व प्राणवायूचा संयाेग हाेऊ न देणे.कार्बन डायऑ्नसाइड पेट घेत नाही. हे ध्यानात ठेवावे.आग विझवणारी यंत्रे या कार्बन डायऑ्नसाइडचा फवारा आगीवर मारतात. व आग विझवतात.कार्बन डायऑ्नसाइड आगीपासून प्राणवायूला दूर ठेवते.
 
उष्णता आगीसाठी आवश्यक असताे.म्हणजे आगीमधून उष्णता काढून घेतली की, आग विझविण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध असताे.ताे म्हणजे आगीवर पाण्याचा फवारा मारला पाहिजे. जळणाऱ्या वस्तूंमधून पाणी उष्णता शाेधून घेतले व तापमान कमी करते. जेव्हा तापमान ज्वलनबिं -दूखाली जाते तेव्हा साहजिकच इंधन जळण्याचे थांबते! पण काही प्रकारच्या आगी पाण्यामुळे विझवता येत नाहीत.कारण तेल व वंगण पाण्यावर तरंगतात. जेव्हा तेल व वंगण पेट घेतात, तेव्हा त्या आगी पाण्याच्या साहाय्याने विझवता येत नाहीत! पाण्याच्या पृष्ठभागावरचा तेलाचा तवंग जळत राहताे.