आपल्या समाजरचनेमुळे डाेमेस्टिक किंवा घरगुती बर्न्सचे प्रमाण जास्त आढळते.त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. तरीही हे रूग्ण दुर्लक्षित असल्याचं दिसतं. मात्र याबाबत आता हळूहळू जनजागृती हाेत आहे.बर्न्स हाेण्याची कारणं म्हणजे चूल आणि उघड्या गॅस तसंच स्टाेव्हवरील कामकाज, इलेक्ट्रिकल प्रणालीमधील दाेष, लहान घरांमध्ये माणसांची गर्दी, स्माेक अलार्मसचा अभाव, दारू आणि ड्रग्सची व्यसनं, सुमार आर्थिक परिस्थिती तसंच हुंडा आणि तत्सम प्रथांचा बर्न्स हाेण्याच्या कारणांमध्ये समावेश हाेताे. घरगुती बर्न्स व्यतिरिक्त व्यवसायाच्या ठिकाणी औद्याेगिक परिसरात हाेणारे अपघात, रासायनिक पदार्थांमुळे हाेणारे बर्न्स तसंच विजेच्या धक्क्यामुळे हाेणारे बर्न्सचा यात समावेश हाेताे. मानवी शरीरावरील त्वचेचे आवरण हे संपूर्ण सरंक्षण कवच आहे. ज्वालांच्या दाहाने हे आवरण नष्ट हाेते आणि त्यामुळेच पुढील सर्व गुंतागुंत वाढायला सुरुवात हाेते.त्वरित उपचार मिळाले नाहीत तर गुंतागुंत वाढत जाते आणि जीवाला अपाय हाेऊ शकताे.
त्यामुळेच त्वरेने रुग्णाला उपचार मिळतील हे बघणं महत्त्वाचं असतं. कारण पहिल्या काही तासात (शाॅक स्टेट) रूग्णांला उपचार मिळणं गरजेचं असतं.प्रचलित नियमाच्या आधारे जळीत रूग्ण किती टक्के जळीत आहे हे ठरवता येतं.त्यानुसार उपचार ठरतात तसंच जळीताचा टक्का उपचार सुरु झाल्यावर बदलू शकताे.जळीत प्रकारामध्ये इलेक्ट्रिकल बर्न्स हा थाेडा वेगळा प्रकार आहे. त्यामध्ये करंट शरीरातून गेल्यामुळे ज्या ठिकाणाहून ताे गेला तेथे उष्णतेने त्वचा जळते. पण करंटचे परिणाम तेथील रक्त वाहिन्यांवर हाेऊन त्या ठिकाणी गंभीर जखमा हाेऊ शकतात.तसंच करंटमुळे हृदयाच्या कंपनांवर परिणाम हाेऊ शकताे. ही लक्षणं सर्व प्रकारचे शाॅक्स बर्न्सच्या रुग्णात दिसू शकतात. याची काही प्रमुख कारणं म्हणजे शरीरातील पाणी कमी हाेणं, शरीराचा दाह आणि त्यामुळे हाेणाऱ्या वेदना, हृदयाला हाेणार अपाय जाे प्रामुख्याने वीजेच्या शाॅकमुळे हाेणाऱ्या जळीतात दिसताे. उपचारानंतरच्या पर्वामध्ये रुग्णाला जंतूंची बाधा हाेऊन त्या प्रकारचा शाॅक त्याच्यामधे दिसू शकताे, ज्याला सेप्टिक शाॅक असंही म्हणतात.