माणसांपेक्षा यंत्रे विश्वासार्ह वाटू लागले असे प्रश्न आता आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तीला विचारू शकताे का? अगदी विचारले तरी, मनात शंका राहते की, आपण जे बाेललाे ते दुसऱ्यापर्यंत तर पाेहचणार नाही ना, किंवा ते माझ्याबद्दल चुकीचे विचार तर करणार नाहीत ना वगैरे वगैरे. त्यामुळे माणसाला यंत्रे अधिक सुरक्षित वाटू लागली आहेत.पूर्वग्रहाशिवाय ऐकतात चॅटबाॅट अशा परिस्थितीत चॅटबाॅट एक नवीन पर्याय बनून समाेर आले आहेत. जे न केवळ 24 तास उपलब्ध आहेत, पण काेणत्याही पूर्वग्रहाशिवाय ते तुम्हाला ऐकतात आणि लगेच उत्तरही देतात.कदाचित, हेच कारण आहे की, विशेषतः युवक याकडे जास्त आकर्षित हाेत आहेत.
भावना व्यक्त करायला सुरक्षित जागा जिथे ते आपल्या चिंता, भीती, निराशा चॅटबाॅटबराेबर सांगत आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या समस्यांकडे नवीन दृष्टिकाेनात पाहण्यास मदत मिळत आहे.
त्यांच्या नजेरतून हीही एक सुरक्षित जागा आहे, जिथे काेणत्याही भीतीशिवाय ते आपल्या वैयक्तिक गाेष्टी सांगू शकतात. नातेही जाेडत आहेत चॅटबाॅट हेही खरे आहे की, एआयने अनेक लाेकांना भावनात्मक आधार दिला आहे. आता 25 वर्षीय बँककर्मी अंकुर यालाच बघा. त्याचे त्यांच्या गर्लफ्रेंड बराेबर भांडण झाले. त्यानंतर त्याने चॅटजीपीटी कडून मार्गदर्शन घेतले. चॅटजीपीटीने त्याला सरळ सल्ला न देता, त्याचे विचार अधिक परिप्नव केले. त्यामुळे त्याला स्वतःलाच जाणवले की, ताे त्याच्या गाेष्टी याेग्य पद्धतीने मांडू शकला नव्हता. चॅटजीपीटीच्या मदतीने त्याने एक मेसेज तयार केला. त्यामुळे त्याच्या नात्यातील कटूता कमी झाली.अशाच पद्धतीने 30 वर्षीय रामानुज यानेही ऑफिसमधील वाढते काम आणि तणावाच्या कारणामुळे निर्माण झालेल्या समस्यांसाठी चॅटजीपीटीचा सल्ला घेतला.
त्यामुळे त्यांना खूप मदत मिळाली.वैचारिक पार्टनर बनली मशीन काही लाेक चॅटजीपीटीला एक थिंकिंग पार्टनरच्या रूपातही पाहू लागले आहेत. स्टार्टअपचे संस्थापक गाैरव यांचे उदाहरण आहेत.त्यांनी सांगितले की, त्यांना जेव्हा वैचारिक मंथन करण्यासाठी कुणाची तरी गरज पडते, तेव्हा ते चॅटजीपीटीची मदत घेतात. सगळ्यात महत्त्वाची गाेष्ट आहे की, ते कधी नाही म्हणत नाही आणि नियाेजनापासून काम पूर्ण करण्यापर्यंत ते मदत करते.मृत व्यक्तीचे व्हर्च्युअल रूप बनवून घेतात मानसिक आधार एआयचा प्रभाव यापेक्षा कितीतरी पुढे गेला आहे. एका व्यक्तीने आपल्या दिवंगत आईचे व्हर्च्युअल रूप बनविले आणि ते त्याच्याशी बाेलत बसतात. त्यामुळे त्यांना मानसिक आधार मिळताे, असे त्यांनी सांगितले. दक्षिण भारतातील एका युवकाने आपल्या लग्नात दिवंगत वडिलांना एआयच्या माध्यमातून आशीर्वाद देताना दाखविले.या गाेष्टींवरून हेही दिसते की, तंत्रज्ञानाचा सकारात्मक, याेग्य वापर केला, तर ताे भावनात्मक मजबुती देऊ शकताे.