प्रत्येक पुरुषाने स्वयंपाक करणे शिकायलाच हवा

    12-Jan-2026
Total Views |
 
 
 

cooking 
वास्तविक पाककला येणे फक्त एक घरगुती काम नसूनन एक आवश्यक जीवनकाैशल्यही आहे. जेव्हा आपण स्वत: स्वयंपाक करताे तेव्हा फक्त आराेग्यच उत्तम राहात नाही तर पैसेही वाचतात व आपले काैशल्यही वाढते. भले आपण वर्किंग असाल वा सिंगल, आपल्या रुची व गरजेनुसार आपल्याला स्वयंपाक यायला हवा.
 
सुरुवात कशी करावी : जर आपण स्वयंपाक करण्याची सुरुवात करीत असाल तर प्रथम एक उत्तम कुक बुक खरेदी करा व ते वाचून स्वयंपाक सुरू करा. तशा तर आजकाल इंटरनेटवर खूप साऱ्या रेसिपी, टिप्स व ट्र्निस मिळतात. त्या फक्त शाेधा व कुकिंग शिकण्यास सुरुवात करा. जेवढे जास्त पदार्थ आपण बनवाल तेवढेच आपले कुकिंग उत्तम हाेईल. सरावानेच आत्मविश्वास व नैपुण्य येते हे लक्षात ठेवा.
 
खाण्यासंबंधित काही मूलभूत गाेष्टी : आता प्रश्न पडताे की कुकिंग किती यायला हवे जेणेकरून पाेटही भरू शकेल. सर्वप्रथम यासाठी आवश्यक आहे साध्या जेवणात आपल्याला काय आवडते. याासाठी काही गाेष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. तरच आपही स्वयंपाक करायला शिकू शकता. उदा. जेवणात वापरल्या जाणाऱ्या मिरची मसाल्याची माहिती असायला हवी. काेणतेही व्यंजन बनवताना हळद, धणे, मिरची, हिंग, गरम मसाला अशा पावडर वा फाेडणीसाठी अखंड मसाले केव्हा व कसे वापरावेत याची माहिती असायला हवी.
 
याप्रमाणेच डाळींचेही ज्ञान असायला हवे. उदा. तूरडाळ, मूगडाळ, हरभराडाळ इ. तांदूळ, दलिया, बेसन, मैदा, पीठ, रवा इ.चीही. यानंतर प्रत्येक सामग्री स्वयंपाकासाठी उकळणे, भाजणे, वाफावणे इ.ची समज वाढवायला हवी. उदाहरणार्थ दाेन बटाटे उकडायचे असतील तर कुकुक छाेटा असायला हवा.साेबतच पाणीही तेवढेच टाका, ज्यात बटाटे थाेडे बुडतील. मीडियम गॅसवर दाेन वा तीन शिटी झाल्यानंतर गॅस बंद करावा. साेबतच माेजमापाचेही भान ठेवावे.यासाठीी मेजरिंग कप ठेव. तसे भारतीय जेवणात भाकरी, चपाती, राेटी बनवणे थाेड आव्हानात्मक वाटू शकते. पण एकदा शिकल्यानंतर हे साेपे हाेते.
 
टाइम मॅनेजमेंट गरजेचे : प्रश्न पडताे की ऑफिसातून थकून आल्यानंतर कसा स्वयंपाक करावा. यासाठी टाइम मॅनेजमेंट हवे. जेव्हा बाहेर जायचे असेल तेव्हा डाळतांदूळ भिजवून जा. माेठ्या कूकरमध्ये खाली कंटेनरमध्ये डाळ, वर तांदूळ व त्याच्या झाकणावर दाेन बटाटै साेलून कापून ठेवा. यामुळे एकाचवेळी तिन्ही पदार्थ शिजतील.फक्त बटाट्याला व डाळीत फाेडणी द्यावी. खाणे तयार आहे.
 
 भात जास्त झाल्यास उरलेला भात म्निसीत थाेडासा फिरवा व दुधासाेबत शिजवा. थाेडी मिल्क पावडर व ड्रायफ्रूट टाका. उत्तम खीर हाेईल.