स्वाभिमानी हाेण्यासाठी राेज स्वत:वर प्रेम करा

    03-Sep-2025
Total Views |
 

thoughts 
 
स्वाभिमान, स्वप्रेम वा स्वमूल्याची सुरुवात आपण प्रेम करण्यालायक आहात यापासून हाेते. जीवनात आपण बहुधा ज्या गाेष्टींशी लढताे त्यापैकी एक आहे स्वत:शी प्रामाणिक हाेणे.जेव्हा आपण स्वत:वर प्रेम करण्याचा विचार करू लागताे तेव्हा ते विचार आपल्याला स्वत:शी प्रामाणिक हाेण्याच्या जवळ आणतात. तेच जर आपण फक्त इतरांना खूश करण्यासाठी काही करताे तेव्हा आपल्या अस्तित्वाचा हेतू नाकारत असताे. स्वत:ला सुखापासून वंचित करीत राहताे. स्वत:वर प्रेम केल्यामुळेच आपण काेण आहाेत हे कळते.स्वत:वर विश्वास ठेवू लागा कित्येकदा आपण स्वत:बाबत अनिश्चित असताे. आपल्या निर्णयांवर टिका करीत राहताे वा आपल्याभाेवतीच्या इतर माणसांच्या मतावर निर्णय घेऊ लागताे.
 
स्वत:वर विश्वास करण्याऐवजी आपण इतरांवर विश्वास का करताे. आपण हे विसरू नये की आपले मानसही अद्वितीय व सुंदर आहे. एका अशा जगात जिथे एखाद्याला ओळखणे वा इतरांसाेबत तुलना करण्याची एवढी घाई असते की, तिथे खऱ्या स्वला दाबणे साेपे हाेऊ शकते. आपण आपल्या संस्कृती वा आई-वडिलांकडून हेच शिकताे व स्वत:ला जाेखू लागताे. ही एका सुखी जीवनाची पद्धत अजिबात नाही. जी स्वत: खास असल्याचे नाकारत असते.स्वत:विषयी प्रामाणिक हाेण्याचे फायदे स्वाभिमान निर्मितीची काेणतीही याेग्य वा अयाेग्य पद्धत नसते. यात आतील बालपण मार्गदर्शकाचे काम करते.त्याच्यावर विश्वास ठेवा. स्वत:वर प्रेम करा व त्या आपल्या सर्वश्रेष्ठ रुपाबद्दल प्रामाणिक राहा.