असे काय झाले आहे माणसाच्या जीवनाला. माणूस इतका अशांत व दु:खद दशेत का आहे? कदाचित माणसाला जे हवे असते ते ताे मिळवू शकत नाही. कदाचित असे तर नाही ना की ज्या सागराला माणूस भेटू इच्छित आहे त्या सागराला भेटू शकत नाही.धर्म हे माणसाला सागराला भेटवणाऱ्या कलेचे नाव आहे. अशा सागराला ज्याला भेटून माणसाला तृप्ती व शांती मिळेल. जाणून घेऊयात जीवनात धर्माची सार्थकता सिद्ध करणारे ओशाेंचे विचार...वर्तमानात पाहता धर्माच्या नावाखाली जे जाळे उभे केले आहे ते माणसाला कुठेही न नेता भरकटवते.
जगात तीनशे धर्म आहेत आणि धर्म तीनही कसे असू शकतात. धर्म तर एकच असू शकताे. सत्य अनेक कसे असू शकते. सत्य तर एकच असेल.पण एका सत्याच्या नावाखाली जेव्हा तीनशे संप्रदाय उभे हाेतात तेव्हा सतयाचा शाेध घेणेही कठिण हाेते.हिूंदू आहे, मुसलमान आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे आणि धार्मिक माणूस काेठेही नाही. धार्मिक माणूस नाही म्हणून एवढी अस्वस्थता, एवढी अशांती आहे.एवढे दु:ख आहे.