प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे आवाहन
27-Sep-2025
Total Views |
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वताेपरी मदत केली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळवले आहे. राज्यातील पूरस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काैतुक करून आभार मानले आहेत.या परिस्थितीचे भान राखून स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याबाबतचे पत्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव आणि सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.