जहाज बांधणी, बंदरे क्षेत्रात गुंतवणुकीच्या माेठ्या संधी उपलब्ध : नितेश राणे

    27-Sep-2025
Total Views |
 
 

rane 
राज्यात जहाज बांधणी आणि बंदरे क्षेत्रात गुंतवणुकीच्या माेठ्या संधी उपलब्ध असून, या क्षेत्रातील गुंतवणूक प्राेत्साहनासाठी राज्याने स्वतःचे जहाज बांधणी धाेरण तयार केले आहे. गुंतवणूकदारांनी या धाेरणाचा लाभ घ्यावा आणि राज्याच्या जहाज बांधणी उद्याेगाच्या विकासात याेगदान द्यावे, असे आवाहन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. तिसऱ्या जागतिक बंदरे आणि जहाज परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राणे बाेलत हाेते. यावेळी परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बेल्जियमचे वाणिज्य दूत फ्रँक गिरकेन्स, नाॅर्वेचे वाणिज्य दूत माेनिका नागेलागार्ड यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते. राज्यातील लहान बंदरांतून माेठ्या प्रमाणावर मालवाहतूक सुरू असून, या क्षेत्रात गुंतवणुकीच्या माेठ्या संधी आहेत. वाढवण प्रकल्पात राज्याचा सहभाग आहे. क्लस्टर विकास माॅडेलवर भर देऊन या उद्याेगाचा विस्तार करण्यात येणार आहे, असे सेठी यांनी सांगितले.