ओशाे - गीता-दर्शन

    27-Sep-2025
Total Views |
 

Osho 
आपण स्वर्गाकडे जाऊ लागलात तर इंद्रियेदेखील आपणाला साथ देतात. ती फ्नत साधन म्हणून आहेत, पण कधी आपण मालकीची घाेषणाच केली नाहीतआपणच आपल्या नाेकरांची लाळ घाेटत राहिलात. तर चूक काेणाची? आणि पुन्हा वर त्यांनाच लाखाेली वाहताहात की, नाेकर लाेक आम्हाला चांगलंच भटकवताहेत, ते आम्हाला भलत्याच ठिकाणी नेत आहेत, निदान ती घेऊन तर चालली आहेत, कुठे ना कुठे-कसे का हाेईना. चालवताहेत तरी, आपण तर हजरच नाही आहात, मेल्यासारखेच आहात, यासाठी कृष्ण अगदी बराेबर डिस्टिं्नशन, भेद करीत आहे. इंद्रिये शत्रू आहेत असे ताे म्हणत नाही आणि जाे काेणी म्हणताे, इंद्रिये माणसाची शत्रू आहेत, त्याला काहीही ठाऊक नाहीये.
 
कृष्ण म्हणताे आहे की, आपण मालक नसलाे म्हणजे आपण आपले शत्रू हाेताे, मालक झालाे की आपण आपले मित्र झालाेच म्हणून समजा.आज इतकं पुरे, पण उठू नका. पाच मिनिटं कीर्तनासाठी थांबावं. शरीर तर म्हणेल की उठा, पण थाेडं शरीरावर नियंत्रण ठेवा. इंद्रियं तर येथून पळ काढण्याला तत्पर झाली आहेत; पण जरा इंद्रियांवर ताबा ठेवा. सुख असाे वा दु:ख, आवडते ते हाेत असाे वा नावडते हाेत असाे, जीवन सफल असाे वा विफल, अशा काेणत्याच द्वंद्वाच्या क्षणी ज्याच्या अंतर्यामीची ज्याेत कंप पावत नाही, जाे निर्विकारपणे अनुद्विग्न, अनुत्तेजित व शांतच राहताे.अशा चेतनेच्या मंदिरात परमसत्ता सदाच विराजते, असे कृष्णाने म्हटले आहे. तीन गाेष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत.एक - जाे द्वंद्वातही स्थिर असताे.