मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांमुळे मुंबई स्वच्छ, सुंदर आणि हिरवीगार आहे. मुंबईकरांचे आराेग्य सुदृढ आहे. स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेचे दूत, वास्तवातील हिराे आहेत. मुंबईकरांच्या आराेग्यासाठी आणि स्वच्छ-सुंदर शहरासाठी सखाेल स्वच्छता माेहीम (डीप क्लीन ड्राइव्ह) सातत्याने सुरू राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.स्वच्छतेबराेबरच पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई महापालिका विविध उपाययाेजना राबवत असून, त्याचे अनुकरण राज्यातील इतर महापालिकांनी करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. ‘स्वच्छता ही सेवा-2025’ या अभियानांतर्गत स्वच्छाेत्सव उपक्रम राबवण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून शिंदे यांच्या हस्ते आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालक मंत्री मंगलप्रभात लाेढा यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक श्रमदान करण्यात आले. महापालिका आयु्नत भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गाेविंद राज, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन साेना, महापालिका उपायु्नत, सहायक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी, कामगार, शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या माेहिमेत सहभागी झाले हाेते. महापालिकेच्या ए विभागातील महात्मा गांधी मार्ग (मेट्राे चित्रपटगृह ते फॅशन स्ट्रीट) परिसरात लाेकसहभागातून सामूहिक स्वच्छता माेहीम राबवण्यात आली. रस्ते, पदपथ स्वच्छ करत पाण्याने धुवून काढण्यात आले. यावेळी स्वच्छतेविषयक सामूहिक शपथ घेण्यात आली.