तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्येमुळे अनिश्चित काळासाठी माेनेरेल बंद करण्यात आली आहे. या माेनाेरेल मार्गावर आता नव्या गाड्यांच्या चाचण्या महामुंबई मेट्राे संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) सुरू केल्या आहेत.या गाड्या लवकरच प्रवासी सेवेत दाखल हाेण्याची आशा आहे.एमएमएमओसीएलने या मार्गावर नवी गाडी चालवून चाचण्या सुरू केल्या आहेत.माेनाेरेलच्या गाड्या जुन्या झाल्याने; तसेच वारंवार तांत्रिक बिघाडामुळे अपघात हाेत असल्यामुळे माेनाे मार्गिकेवर गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी व वाहतूक सुरळीत हाेण्यासाठी एमएमआरडीएने 10 नव्या गाड्या खरेदी केल्या. त्यातील आठ गाड्याएमएमआरडीएच्या ताफ्यात दाखल झाल्या.या गाड्यांची चाचणी पूर्ण करून त्या प्रवासी सेवेत आणल्या जाणार आहेत.या मार्गिकेसाठी नवीन सीबीसीटी यंत्रणा बसवली जाईल. नव्या गाड्या मार्गावर आल्यानंतर दर 5 मिनिटांनी एक गाडी धावेल, असा विश्वास एमएमएमओसीएलने व्यक्त केला आहे.