उद्याेजकांना इंडाेनेशियात निर्यातीची संधी; वाणिज्य दुतांकडून माहिती

    27-Sep-2025
Total Views |
 


commerce
 
भारत आणि इंडाेनेशियातील आर्थिक संबंध लक्षणीयरित्या वाढत आहेत. हे संबंध पुढे नेण्याचे काम काेल्हापुरातून हाेऊ शकते. या भागातील नानाविध अभियांत्रिकी उत्पादने, साखर उद्याेगाचे सुट्टे भाग, वस्त्राेद्याेग, पॅकिंग मटेरियल आदी उद्याेगास इंडाेनेशियात निर्यात करण्याची माेठी संधी आहे. त्याचा लाभ काही स्थानिक उद्याेजक घेत असून, अनेकांनी ही संधी साधली पाहिजे, असे मत इंडाेनेशियाचे काैन्सुलट जनरल एडी वार्डाेयाे यांनी येथे व्य्नत केले.भारत-इंडाेनेशियातील व्यापारी, औद्याेगिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी; तसेच काेल्हापुरातील गुंतवणुकीच्या संधींविषयी चर्चा करण्यासाठीेथे आयाेजिण्यात आलेल्या चर्चेत वार्डाेयाे बाेलत हाेते. काेल्हापूर इंजिनिअरिंग असाेसिएशन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह विविध उद्याेजकांनी भाग घेतला.
 
इंडाेनेशिया काैन्सुलेटचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख इकाे ज्युनाॅ यांनी भारतीय उद्याेजकांना इंडाेनेशियात असलेल्या निर्यात संधीची माहिती दिली. जागतिक समस्यांना चांगल्या प्रकारे ताेंड देण्यासाठी आणि दाेन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि इंडाेनेशियाने नवीन व्यापार चॅनेल सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.भारत आणि इंडाेनेशियाचे दाेन हजार वर्षांहून अधिक काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. दाेन्ही देश सागरी शेजारी आणि धाेरणात्मक भागीदार असल्याने त्यांचे महत्त्वाचे आणि जवळचे संबंध आहेत. येत्या काळात वाढत्या द्विपक्षीय आणि सामुदायिक संबंधांसह दाेन्ही देशांत आणखी वाढ हाेण्याची क्षमता आहे, असे यावेळी सांगण्यात आले.