युकेझ ॲकॅडमीच्या विद्यार्थिनींना पुरस्कार

    26-Sep-2025
Total Views |
 
 yuk
 पुणे, 25 सप्टेंबर,
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
जळगाव येथे झालेल्या ऑल इंडिया राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धे त पुण्याच्या युकेझ तायक्वांदो ॲकॅडमीच्या दिशा मेहता हिला सुवर्णपदक आणि बेस्ट फायटर अवॉर्ड मिळाले. तसेच उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रिजुल सवडतकर हिला कांस्यपदक मिळाले. दोघींनाही ॲकॅडमीचे प्रशिक्षक विशाल सुतार व योगेश पिंपळे यांचे मार्गदर्शन लाभले. दिशा मेहता ट्री हाऊस स्कूल येथे, तर रिजुल सवडतकर ही श्रीश्री रविशंकर विद्यामंदिर येथे शिकत आहेत. दोन्ही विद्यार्थिनींनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल ॲकॅडमीचे अध्यक्ष भानुदास जोशी, सेक्रेटरी उमेश कुलकर्णी व खजिनदार दत्ता पिसे यांनी त्यांचे अभिनंदन केले.