12 वी पश्चिम विभागीय शॉटगन शूटिंग चॅम्पियनशिप, भोपाळ मध्य प्रदेश येथे 18 ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान संपन्न झाली. या शॉटगन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सर्व पश्चिम विभागीय राज्यांचे नेमबाज सहभागी झाले होते. या शॉटगन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये तळेगाव दाभाडे पुणे येथील अनघा सचिन काळोखे, (वय 14, महाराष्ट्र) हिने नेमबाज महिला गटात कांस्य पदक जिंकले. गेल्या महिन्यात तिने राज्य स्पर्धेत 3 सुवर्णपदके जिंकली होती आणि आता ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. तिचे प्रशिक्षक हेमंत बालवडकर आहेत, जे तिला बालेवाडी स्टेडियममध्ये शिकवत आहेत.