मुंबई, 22 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद गुळभिले पाटील यांनी सौ. अरुणा हरीशचंद्र महानगरे यांची महासंघाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली असून, त्या सामाजिक संघटनेचा अधिकाधिक विस्तार करून दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडतील व संघटनेच्या नेत्यांचे विचार समाजातील लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.