ही नळी नाकाचा मागचा भाग आणि कानाच्या मध्यभागापर्यंत आलेली असते व शरीराच्या आतील आणि बाहेरील दाब यांच्यात नियंत्रण साधण्याचे काम ती करत असते. नळी चाेंदल्यामुळे कानाच्या मध्यभागी दाब निर्माण हाेताे आणि कानाचा पडदा बाहेरील बाजूस फुग्यासारखा फुगताे. खूप दाब असल्यास कानाचा पडदा फाटून रक्त अथवा पू वाहण्याचे प्रकारही घडतात. यामुळे असह्य वेदना हाेतात. लहान मुलांची कानाचा मध्यभाग व घसा यांना जाेडणारी नळी अधिक आडवी असते. त्यामुळे बाळ झाेपून दूध पिताना ते कानात घसरत जाऊन नळीत साचण्याची शक्यता जास्त असते. तसेच, लहान मुलांची प्रतिकारशक्ती तितकीशी विकसित न झाल्याने जंतुसंसर्ग लगेच हाेताे.यामुळेच बाळाची ही कान-नाक-घसा तपासणी करुन घेणे. तसेच, बाळाच्या कानात तेल, लसूण असे पदार्थ न घालणे याकडे पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे.