आपल्यालाही कधी याचा अनुभव आला असेल.एक जण रस्त्यातून पळत चालला आहे. त्याच्या घराला आग लागलेली आहे... त्याला नमस्कार करा तरी त्याच्या लक्षातही येत नाही. त्याला विचारा. ‘काय कसं काय चाललंय?’ ताे काहीएक उत्तर देत नाही. ताे तर पळत सुटलाय त्याला हा प्रश्न ऐकूही येत नाहीये. दुसऱ्या दिवशी त्याला भेटा आणि विचारा. ‘काय हाे. काय झालं हाेतं काल? तुम्हाला हटकलं हाेतं मी. नमस्कार पण केला हाेता. धरून हलवलंही हाेतं. पण तुम्ही कसले झटका देऊन सुटलात ते. मला पाहिलं सुद्धा नाही. आठवतंय तरी का?’ ताे माणूस म्हणेल. ‘मला काहीही माहिती नाही. काल माझ्या घराला आग लागली हाेती.’ घराला आग लागल्यावर सारी चेतना तिकडे केंद्रित हाेते.डाेळ्यांच्या झराेक्यापासून चेतना बाजूला सरकते.
कानांच्या खिडक्यापासून बाजूला सरकते. मग भले डाेळ्यांना दिसत असले तरी त्या माणसाला दिसत नसते.कानाला ऐकू आले तरी त्या माणसाला ऐकू येत नसते.जर सावधानता. अॅटेंशन बाजूला झाले. इंद्रियांपासून लक्षच बाजूला झाले तर इंद्रिये बिलकुल बेकार हाेऊन जातात. ज्या इंद्रियाशी लक्ष जुळलेलं असतं. तेच इंद्रिय सार्थक. सफल असतं. सक्रिय. सशक्त असतं.लक्ष कुणाचं असतं? ते मालकाचं असतं. इंद्रिये फक्त इंस्ट्रुमेंटस्. उपकरणे आहेत. गुलाम आहेत.पण हे थाेडे खाेलात जाऊन पाहावे लागेल. आपण जेव्हा काेणाला पाहता. सध्या जसे मला पाहता आहात.तेव्हा लक्ष द्या की, डाेळे पाहत आहेत की तुम्ही पाहत आहात? तुम्ही पाहत असाल तर डाेळे हे फक्त मधला दरवाजा आहेत. पलीकडे आपण आहात. आणि ज्याला आपण पाहताहात ताे मी नाहीये.