येथे एआयआयएफए (आयफा) आयाेजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात राज्य शासनाच्या उद्याेग विभागाने नऊ कंपन्यांशी 80962 काेटींचे सामंजस्य करार केले. यामुळे राज्यात 40300 राेजगार निर्मिती हाेणार आहे.गडचिराेली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा आदी जिल्ह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. गडचिराेलीत सुमेध टुल्स प्रा.लि.आणि हरिओम पाइप इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रकल्पांमुळे 5500 राेजगार उपलब्ध हाेणार असून, 5135 काेटींची गुंतवणूक हाेणार आहे. छत्रपती संभाजीनगरात एनपीएसपीएलअॅडव्हान्स्ड मटेरियल (अथा ग्रुप) प्रा.लि.तर्फे 5440 काेटींची गुंतवणूक करून ‘क्रिटिकली अॅडव्हान्स्ड लिथियम बॅटरी मटेरियल आणि कार्बन काॅम्प्लेक्स’ उभारले जाणार आहे.
यामुळे 5000 राेजगार निर्मिती अपेक्षित आहे. वर्धा येथे रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा.लि.चा 25000 काेटींचा एकात्मिक स्टील प्रकल्प येणार असून, यामुळे 12000 राेजगार निर्मिती अपेक्षित आहे. रायगडमध्ये जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचा 41580 काेटींचा स्टेनलेसस्टील प्रकल्प हाेणार असून, त्याद्वारे 15500 राेजगार निर्माण हाेतील.चंद्रपूर, सातारा व नागपूर येथेही स्पंज आयर्न, ऑटाेमाेटिव्ह स्टील पार्ट्स आणि आयएसपी प्रकल्प उभारले जाणार आहेत.वाईत फिल्ट्रम टाेकाॅम्प प्रा.लि. 100 काेटींची ऑटाेमाेटिव्ह स्टील पार्टमध्ये गुंतवणूक करत असून, याद्वारे 1200 राेजगार निर्मिती हाेणार आहे. या गुंतवणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि काेकणातील औद्याेगिक विकासाला गती मिळणार असून, स्थानिकांना माेठ्या प्रमाणावर राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.