यंदाचा सर रा. गो. भांडारकर स्मृतीपुरस्कार प्रा. के. पद्दय्या यांना जाहीर

    02-Sep-2025
Total Views |
 
 y
पुणे, 1 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील विद्वत्तेकरिता आणि कार्याकरिता दिला जाणारा यंदाचा सर रा. गो. भांडारकर स्मृती पुरस्कार नामवंत पुरातत्त्वज्ञ आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातील प्राध्यापक पद्मश्री प्रा. के. पद्दय्या यांना जाहीर झाला आहे. सर भांडारकरांच्या स्मृतिशताब्दी कार्यक्रमामध्ये भांडारकर संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
 
अश्मयुगातील निरनिराळ्या कालखंडांचा आणि संस्कृतींचा धांडोळा प्रा. पद्दय्या यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर पुरातत्त्वातील सिद्धांत आणि कार्यपद्धतींवर त्यांचे चिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे संचालकपद त्यांनी भूषवलेले असून, अनेक ग्रंथ आणि शोधनिबंधांसंग्रहांचे लेखन आणि संपादन केलेले आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.