एरंडवणेमधील मोरे विद्यालयात 25 वर्षांपूर्वीच्या बॅचमेटचा मेळावा

    19-Sep-2025
Total Views |
 
 yer
 
भारती विद्यापीठाच्या एरंडवणे येथील शंकरराव मोरे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक दिनानिमित्त रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी 2000-2001च्या अकरावी माजी विद्यार्थ्यांनी गुरुजन सन्मान सोहळा आणि स्नेहमेळावा साजरा केला. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी श्री. तागड सर, सौ.जाधव मॅडम, श्री. पाटील सर, श्री. बेलवाले सर या त्यांना शिक्षण देणाऱ्या गुरुजनांचा यथोचित सन्मान केला. सोबतच सध्याचे प्रभारी श्री. पाटील सर, श्री. गुरव सर, वैशाली कदम मॅडम, श्री. विभूती सर व इतर स्टाफचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला 55 इंच टीव्ही सप्रेम भेट दिला. तसेच शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्नेहभोजन व फोटोसेशनने कार्यक्रमाची सांगता झाली.