महापारेषणच्या नागपुरातील उपकेंद्राचे काम वेळेपूर्वी पूर्ण
11-Sep-2025
Total Views |
महापारेषणच्या नागपूर परिमंडळांतर्गत 220 केव्ही पाचगाव उपकेंद्र व संलग्नित 220 केव्ही कन्हान-उमरेड लिलाे विद्युत वाहिनीचे (22 सर्किट कि.मी.) काम वेळेच्या आठ महिने आधीच पूर्ण करण्यात आले. मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल महापारेषणचे काैतुक केले आहे.ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला यांच्या निर्देशानुसार महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डाॅ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात पाचगाव येथील 220/33 केव्ही उपकेंद्र आणि संलग्नित 220 केव्ही कन्हान-उमरेड लिलाे वाहिनी निर्धारित वेळेच्या आठ महिने आधी पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली. यामुळे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका आणि लगतच्या नागपूर ग्रामीण भागातील घरगुती; तसेच औद्याेगिक विद्युत ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या उपकेंद्रामुळे विद्युत ग्राहकांना याेग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे.