भूसंपादनाशिवाय पंढरपूर-महाड रस्ता रुंदीकरण नको

    11-Sep-2025
Total Views |
 
 
 

Mahad 
पंढरपूर-महाड रस्त्याच्या विस्तारीकरणामुळे भाेर तालुक्यातील सुमारे पाचशे शेतकऱ्यांची शंभर हेक्टर जमीन बाधित हाेत आहे. शासनाच्या नियमानुसार याेग्य भूसंपादन प्रक्रिया करून माेबदला आणि पुनर्वसनाची तरतूद केल्याशिवाय काम सुरू करता येत नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता बांधकामाचे काम थेट सुरू केल्याने शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विराेध करीत न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर मंगळवारी (दि. 9) सकाळपासून धरणे आंदाेलन केले.पंढरपूर-महाड रस्ता भाेर तालुका हद्दीतील गावामध्ये वडगाव डाळपासून वरंधाघाटमार्गे महाडकडे जाताे. त्यामुळे भाेरमधील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन न करता चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे काम सुरू केले. यामुळे शेतकरी कुटुंबांचे उपजीविकेचे साधन धाेक्यात आले आहे. शेतीवरील पिके, विहिरी, झाडे, घर व इतर स्थावर मालमत्तेचे नुकसान हाेण्याची शक्यता आहे.
 
शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन न करता जबरदस्तीने रस्ता बांधकाम हाेणे हे अन्यायकारक व कायद्याविरुद्ध असून, शेतकऱ्यांनी गेल्या दीड वर्षापासून या प्रकल्पाला विराेध केला आहे.या कामाविराेधात भाेरमधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.भूसंपादन प्रक्रिया झाल्याशिवाय रस्ता रुंदीकरण करू नये, अशी मागणी केली. लवकरच या विषयावर संयु्नत बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.यावेळी शेतकरी विकास संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह सचिव अजय कुडले, रघुनाथ पारठे, रवी कुडले, दत्ता परखंदे, अंकुश पारठे, आदित्य बांदल, अंकुश मळेकर व अन्य शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.रस्त्याचे काम थांबवावे संजय शिंदे म्हणाले, भूसंपादनाची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावरच रस्त्याचे काम सुरू करावे.जमिनीचा याेग्य व न्याय माेबदला; तसेच पुनर्वसनाची तरतूद करावी.