वाहन परवाना चाचणी शिबिरांमध्ये माेठी वाढ

    10-Sep-2025
Total Views |
 

RTO 
 
कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कार्यक्षेत्रात राेज माेठ्या प्रमाणावर नागरिक वाहन परवाना संबंधित कामासाठी येतात. त्यात प्रामुख्याने शिकाऊ व प्नका परवाना यासाठी माेठी मागणी असते.मात्र, सध्याच्या शिबिर कार्यालयांत वाहनचालकांना चाचणीसाठी वेळच उपलब्ध हाेत नसल्याने अनेकांना गैरसाेयीचा सामना करावा लागत हाेता. लाेकसंख्या वाढ, वाढलेली वाहनधारकांची संख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी मागणी लक्षात घेता या शिबिरांत वाढ करण्यात आल्याची माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिली.लाेकसंख्या वाढ, वाढती वाहनधारकांची संख्या आणि वाढणारी परवान्यांची मागणी लक्षात घेता परिवहन विभागाकडे माेठ्या प्रमाणात शिकाऊ व प्नका या दाेन्ही सेवांसाठी माेठी मागणी असते.
 
मात्र, यासाठी चाचणी देण्यासाठी माेठी यादी असते. त्यामुळे अनेक दिवस वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागते. नागरिकांना हाेणारा त्रास कमी करणे आणि परवाना सेवा अधिक कार्यक्षम बनवणे हा उद्देश ठेवून कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शिबिरांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन शिबिरांमुळे वाहन परवाना चाचणीसाठी अधिक वेळ उपलब्ध हाेणार असून, अर्जदारांना त्यांच्या नियाेजित तारखेलाच चाचणी देता येईल. त्यामुळे नागरिकांना साेयीस्कर सेवा मिळेल; तसेच परिवहन विभागाच्या दृष्टीने कामकाजाचा वेग वाढणार असून, अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक हाेईल. यामुळे विशेषतः विद्यार्थी, नाेकरीसाठी परवाना आवश्यक असणारे युवक तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना माेठा दिलासा मिळेल.
 
वाढीव शिबिरांमुळे राेज अधिकाधिक अर्जदारांना सुविधा उपलब्ध हाेणार असून, परवाना प्रक्रिया जलद आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अंबरनाथ, बदलापूर आणि मुरबाड अशी तीन शिबिर कार्यालये कार्यरत आहेत. या तिन्ही ठिकाणी नियमितपणे परवाना प्रक्रियेचे कामकाज पार पडते.मात्र, दिवस मर्यादित असल्यामुळे आणि चाचणीसाठीचा दिवस मिळवण्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे अनेकांना परत जावे लागत हाेते. या पार्श्वभूमीवर शिबिर कार्यालयांचे वेळापत्रक नव्याने आखण्यात आले असून, त्यात वाढ करण्यात आल्याचे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुताेष बारकुल यांनी सांगितले आहे.